मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
शालेय मुलांना खर्रा, गुटखा, तंबाखूचे व्यसन जडले आहे. त्यातून विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शाळेच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री केली जात असल्याने तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम आता जिल्हा परिषदेच्या माध्यामिक शिक्षण विभागाने सुरू केली आहे.
आमच्या शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे दुकाने आहेत किंवा नाहीत याबाबतचे प्रतिज्ञापत्र माध्यामिक विभागाला सादर करण्यासंदर्भातील सूचना जिल्ह्यातील प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितले आहे.
मुख्याध्यापक अन् पालकांची जबाबदारी
शाळा-महाविद्यालयाच्या २०० मीटरच्या परिसरात तंबाखू, गुटखा, सिगारेटसह इतर तंबाखूजन्य पदार्थ कोणी विक्री करीत असेल, तर त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालक, मुख्याध्यापक आणि प्राचार्याची आहे.
थेट विक्रेत्याला बोलण्याऐवजी पोलिसांची मदत घेऊन कारवाई केल्यास भविष्यात मुले व्यसनी होणार नाहीत असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. नुकतेच मनसेने आंदोलन करीत याकडे लक्ष वेधले होते. तक्रारी प्राप्त होताच आता शिक्षण विभागाने कारवाईसाठी पाऊल उचलले आहे.
सुरुवातीला दंड नाहीतर थेट गुन्हा दाखल
शाळा-महाविद्यालयाच्या २०० मीटरच्या परिसरात गुटखा, तंबाखू, सिगारेटसह इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. जिल्हा परिषद शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत गुटखा विक्री होत असल्यास सुरुवातीला दंड करण्यात येणार आहे. त्यानंतरही विक्री सुरूच ठेवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे माध्यमिक विभागाने सांगितले.
शाळा-महाविद्यालयाच्या १०० मीटरच्या परिसरात गुटखा, तंबाखू, सिगारेटसह इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. शाळा परिसरात तंबाखूजन्य विक्री करणारे दुकाने नाहीत याबाबतचे प्रतिज्ञापत्र मुख्याध्यापकांना देण्यास सांगितले आहे. आम्ही कारवाईसाठी मोहीम सुरू करणार आहोत.- सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, माध्यामिक विभाग, जिल्हा परिषद
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शाळा परिसरात असलेल्या पानटपऱ्यांवर कडक कारवाई करावी. आम्ही आंदोलन करून शिक्षणाधिकारी यांना इशारा दिला आहे. आणखीन काही दिवस कारवाईची वाट पाहू. कारवाई न केल्यास मनविसेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्ही पानपट्टी घालणार आहोत.अभिषेक रंपुरे, जिल्हाध्यक्ष, मनसे(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज