mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 11, 2026
in मंगळवेढा, शैक्षणिक
एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग। 

तहसील कार्यालय मंगळवेढाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान अभियान अंतर्गत तिसऱ्या शिबिराला पाठखळ येथे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आजच्या तालुक्यातील तिसऱ्या शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, करुणा शिवशरण, पंचायत समिती सभापती दीपाली ताड, उपसभापती अर्जुन मल्लाळे, पंचायत समिती सदस्य विनायक यादव, आप्पासो निकम, सुरेश कांबळे,

उपविभागीय अधिकारी बी.आर.माळी, उद्योजक आनंद ताड, श्रीकांत गणपाटील, जनार्धन शिवशरण, सरपंच ऋषीराज बिले व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच पंचायत समिती सदस्य विनायक यादव, जयश्री कवचाळे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती दीपाली ताड होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार मदन जाधव यांनी केले, तर आभार ग्राम महसूल अधिकारी अर्चना लोखंडे यांनी मांडले.

शिबिराला पंचायत समिती, कृषी विभाग, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख विभाग, पशू संवर्धन विभाग व महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पाठखळ येथील सिद्धनाथ मंगल कार्यालय येथे हे शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये महसूल विभाग व इतर विभागाचे असे एकूण 25 स्टॉल  उभारण्यात आले होते.

तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी एकाच छताखाली महसूल विषयक सेवा देताना दिसून आले तर तहसील कार्यालयातील सर्व शाखांमधील अधिकारी व कर्मचारी यांनी सुद्धा जनतेला तात्काळ सेवा उपलब्ध करून दिल्या.

मंगळवेढा तालुक्यात एकूण 6 शिबीर राबविण्यात येणार असून काल पाठखळ मंडळाच्या वतीने तिसऱ्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी मंगळवेढा, बोराळे, आंधळगाव, मारापूर या मंडळाच्या वतीने शिबिर यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले होते.

काल झालेल्या शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत महसूल विषयक व इतर विभागांच्या सेवांचा लाभ घेतला.

आजच्या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या वतीने सर्वात जास्त म्हणजे 1968 लाभार्थ्यांना लाभ दिला, त्यामध्ये प्रामुख्याने, अभियानांतर्गत आजरोजी निकाली काढण्यात आलेल्या

फेरफारांची संख्या – 201,  अभियानांतर्गत 7/12 मधील दुरुस्ती संदर्भात स्वीकारण्यात आलेल्या अर्जांची संख्या – 04, अभियानांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या डिजिटल 7/12 उपलब्ध करून दिलेली संख्या – 860, अभियानांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या एकूण 8 अ उताऱ्यांची संख्या – 643 अभियानांतर्गत वितरित करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची संख्या – 256, अभियानांतर्गत एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत निकाली काढण्यात आलेल्या अर्जांची संख्या – 02, अभियानांतर्गत भूसंपादन प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या – 1, अभियानांतर्गत अकृषक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्यात आलेल्या एकूण प्रकरणांची संख्या -1
त्याचबरोबर संजय गांधी योजनेच्या वतीने 23, पुरवठा विभागाच्या वतीने 28, अभिलेख शाखेच्या वतीने मंडळातील 06 लाभार्थ्यांना शेतकुंडली वाटप, 03 लाभार्थ्यांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र वाटप, मोफत वाळू वाटप आदेश 03, निवडणूक विभाग मतदार यादीत नाव समाविष्ट करणे 05, महा ई सेवा केंद्र मार्फत 182 असे  महसूल विभागाच्या वतीने  आज एकूण 1968 नागरिकांना विविध सेवांचा लाभ देण्यात आला.

त्याचबरोबर पंचायत समिती -233, कृषी विभागाच्या -20, आरोग्य विभाग – 93, महिला व बाल विकास विभाग -101, पशुसंवर्धन विभाग -24, भूमी अभिलेख विभाग -02, उमेद अभियान – 15 असे आजच्या शिबिरात एकूण 2223 लाभार्थ्यांना एकाच दिवशी लाभ देण्यात आला.

सभापती दीपाली ताड यांचा पुढाकार

​पंचायत समिती सभापती दीपाली ताड यांनी या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. शिबिराच्या नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत त्यांनी स्वतः उपस्थित राहून प्रत्येक स्टॉलला भेट दिली आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला.

उत्स्फूर्त प्रतिसाद प्रशासकीय कामाला बळ देणारा

​नागरिकांना सरकारी कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, हाच या अभियानाचा मुख्य हेतू आहे. पाठखळमधील उत्स्फूर्त प्रतिसाद प्रशासकीय कामाला बळ देणारा आहे. – मदन जाधव, तहसीलदार, मंगळवेढा

​पुढील शिबिरांचे वेळापत्रक: नागरिकांनी लाभ घ्यावा!

​मंगळवेढा तालुक्यातील उर्वरित शिबिरांचे नियोजन खालीलप्रमाणे असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे:

​१७ एप्रिल: मरवडे
​०८ मे: भोसे
​१५ मे: मंगळवेढा नगर परिषद हद्द

या ठिकाणी होणाऱ्या शिबिरांना सुद्धा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध महसूल विषयक व इतर विभागांच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.

आजचे शिबिर यशस्वी होण्यासाठी नायब तहसीलदार शीतल कन्हेरे, निवासी नायब तहसीलदार शिरीष शहापुरे, निवडणूक नायब तहसीलदार जयश्री स्वामी, मंडळ अधिकारी मौलवी, अर्चना लोखंडे व पाठखळ मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील, ग्रामपंचायत अधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले. या शिबिराला तालुक्यातील इतर सर्व मंडळ अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी आवर्जून उपस्थित होते.

सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती सभापती दीपाली ताड यांनी विशेष प्रयत्न केले. शिबिराच्या तयारी पासून ते शिबीर संपन्न होईपर्यंत स्वतः सर्व बाबीकडे लक्ष दिले तसेच त्यांनी पूर्ण वेळ शिबिरामध्ये हजेरी लावत सर्व स्टॉलला भेट देऊन अधिकारी, कर्मचारी यांचे मनोबल वाढवले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा पंचायत समिती सभापती दीपाली ताड

संबंधित बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
Next Post
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला 'यमदूत'; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 18, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा