mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

लगीन देवाचं! पंढरपुरात रंगला विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 17, 2021
in सोलापूर, राज्य
पंढरपूर ब्रेकिंग! कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन तीन दिवस बंद राहणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरीच्या विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा मोठ्या ऊत्साह आणि भक्तीभावात संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या विवाह सोहळ्यासाठी मंदिराच्या सभामंडपात मंदिर समितीचे सदस्य व कर्मचारी तसेच माध्यम प्रतिनिधी आदी मोजकेच लोक उपस्थित होते.

त्याचबरोबर संध्याकाळी साध्या पध्दतीने नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे.मंगळवार दि. 16 रोजी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचीही लगीनघाई सुरू होती.

विठ्ठल मंदिरातील सभामंडपात भव्य मंच सजवण्यात येत होता आणि त्याला आकर्षक फुलांची रोषणाई करण्यात आली होती.विठ्ठल आणि रखूमाईचा गाभारा विविध प्रकारच्या रंगीत, सुगंधीत फुलांनी लगीन घरासारखा सजवला होता.

तर एरवी टाळ मृदंग आणि विठ्ठलाच्या नामघोषाने गजबजणार्‍या विठ्ठल मंदिरात मंगळवारी मंगल अक्षता, सनई चौघडे आणि उपस्थित व-हाडी मंडळी यांची लगबग होती. बाहेर सोन्याचे बाशिंग बांधून देवाचं लगीन लावण्यासाठी मोजकीच वर्‍हाडी मंडळी मोठ्या ऊत्साहाने या लग्नसोहळ्यास उपस्थित होती.

वसंत पंचमीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह झाला होता, अशी आख्यायिका आहे. त्यानुसार दरवर्षी हा विवाह सोहळा मंदिर समिती श्री विठ्ठल मंदिरात साजरा करून परंपरा जपत आहे.

हा विवाह सोहळा दिमाखदार करण्यासाठी म्हणून संपूर्ण मंदिर आणि गाभारा झेंडू, शेवंती, गुलाब, निशीगंध, ऍथोरीयम, ऑरकेड, कामीनी, तगर, अष्टर, बिजली, ग्लॅडीओ, जरबेरा, ड्रेसेना, तुळशी, इतर प्रकारच्या २५ ते ३० जातीच्या ५ टन आकर्षक फुलांनी सजविला होता.

पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांनी मोफत फुलांची आरास केली. सकाळी ११ वाजता श्री विठ्ठल आणि रुक्मिणीला शुभ्र वस्त्र मोत्याचे दागिने, नथ, हिरवा चुडा आणि शुभ्र अलंकाराने सजविले गेले.

तर विठ्ठलासही पांढर्‍या शुभ्र वस्त्र आणि सुवर्णालंकारांनी सजवले होते. बंगळूर येथील भाविक सविता चौधरी यांनी विठ्ठल रुक्मिणीस त्यांनी स्वतः बनवलेला पोशाख श्रीस घातला होता.

रुक्मिणीमातेच्या गाभार्‍यातून श्री विठ्ठलाकडे गुलाल नेला आणि तिथे गुलालाची उधळण केली. त्यानंतर विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणीमातेकडे नेण्यात आला व तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली.

त्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचे अलंकाराने सजविलेली उत्सवमूर्ती सभामंडपात विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आणली गेली.

यावेळी दोनीही देवतांना मुंडावळ्या बांधल्या होत्या. अंतरपाट धरण्यात आला. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सपत्नीक विवाह लावण्यात आला.

उपस्थिती वर्‍हाडी मंडळींना फुल आणि अक्षता वाटप केल्यानंतर मग मंगलाष्टका संपन्न झाल्या. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून आणि टाळ-मृदुंगाच्या जयघोष केला. उपस्थित वर्‍हाडी मंडळींनी विवाह संपन्न झाल्यानंतर आनंदाच्या भरात गाण्यावर ठेका धरला.

या विवाह सोहळ्यास मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, सदस्य व नगराध्यक्षा साधनाताई भोसले, शकुंतला नडगिरे, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी मंदिर समितीचे सदस्यांसह मोजकेच वर्‍हाडी मंडळी या विवाह सोहळ्यास उपस्थित होते.

विवाह सोहळ्यानंतर उपस्थित वर्‍हाडी मंडळींना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंढरपूरविठ्ठल मंदिरशाही विवाह सोहळा

संबंधित बातम्या

मंगळवेढयात आजीच्या अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या नातूचा अस्थी विसर्जन करण्याआधीच अपघाती मृत्यू

सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ रोडवर भीषण अपघात, दोन कारच्या धडकेत डॉक्टर दाम्पत्यासह ६ ठार; तीन जखमी

May 22, 2022
धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

संतापजनक! ‘या’ कारणासाठी विवाहितेचा छळ, पतीने गुपचुप केले दुसरे लग्न; सोलापूर जिल्ह्यातील घटना

May 22, 2022
ऊस बिल मागण्यास गेलेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्याला कारखान्याच्या चेअरमन कडून मारहाण

बापरे..! पोलीस स्टेशनच्या आवारातच तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हा, यात्रेत रद्द झालेल्या कुस्त्याचे कारण

May 22, 2022
राज गर्जना! जनतेशी गद्दारी का? ठाकरे सरकार स्थापनेवरुन राज ठाकरेंचा शिवसेनेसह यांच्यावर साधला निशाणा…

तू आहेस कोण? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख; निवडणुका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करु; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

May 22, 2022
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात होणार नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

खबरदार! उजनीच्या पाण्यावरून आ.समाधान आवताडे आक्रमक; यांना दिला सज्जड इशारा

May 22, 2022
पैसा वसूल! मंगळवेढयातील रिलायन्स पंपावर डिझेल भरा अन बक्षिस मिळावा

मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा! एलपीजी गॅस सिलेंडर,पेट्रोल, डिझेल दरात ‘इतक्या’ रूपयांची कपात; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू

May 21, 2022
…अन् भरमेळाव्यात जयंत पाटील यांनी भगिरथ भालकेंचे कान टोचले; लोकांमध्ये मिसळून काम करा..दिला सल्ला

शेजारधर्म पाळला! भारतनानांचे स्वप्न साकार, मंत्री जयंत पाटील यांची वचनपूर्ती; आता मंगळवेढा तालुका सुजलाम सुफलाम करण्याचा ‘हा’ शब्द राहिला

May 21, 2022
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

उजनीचे पाणी तापले! राष्ट्रवादी सोलापुरचा पालकमंत्री बदलणार, यांच्या नियुक्तीच्या हालचाली; शरद पवारांचे जिल्ह्यातील नेत्यांना स्पष्ट संकेत

May 21, 2022
Breaking! मंगळवेढ्यातील सहा विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले, पालक चिंताग्रस्त; विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी आ.आवताडेंचे प्रयत्न सुरू

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ आमदाराच्या कारचा अपघात; गाडीचे 3 टायर फुटल्याने घडला अपघात

May 20, 2022
Next Post
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! दहावी-बारावी बोर्ड परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी होणार परीक्षा

ताज्या बातम्या

मंगळवेढयात आजीच्या अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या नातूचा अस्थी विसर्जन करण्याआधीच अपघाती मृत्यू

सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ रोडवर भीषण अपघात, दोन कारच्या धडकेत डॉक्टर दाम्पत्यासह ६ ठार; तीन जखमी

May 22, 2022
धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

संतापजनक! ‘या’ कारणासाठी विवाहितेचा छळ, पतीने गुपचुप केले दुसरे लग्न; सोलापूर जिल्ह्यातील घटना

May 22, 2022
ऊस बिल मागण्यास गेलेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्याला कारखान्याच्या चेअरमन कडून मारहाण

बापरे..! पोलीस स्टेशनच्या आवारातच तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हा, यात्रेत रद्द झालेल्या कुस्त्याचे कारण

May 22, 2022
राज गर्जना! जनतेशी गद्दारी का? ठाकरे सरकार स्थापनेवरुन राज ठाकरेंचा शिवसेनेसह यांच्यावर साधला निशाणा…

तू आहेस कोण? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख; निवडणुका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करु; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

May 22, 2022
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात होणार नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

खबरदार! उजनीच्या पाण्यावरून आ.समाधान आवताडे आक्रमक; यांना दिला सज्जड इशारा

May 22, 2022
पैसा वसूल! मंगळवेढयातील रिलायन्स पंपावर डिझेल भरा अन बक्षिस मिळावा

मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा! एलपीजी गॅस सिलेंडर,पेट्रोल, डिझेल दरात ‘इतक्या’ रूपयांची कपात; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू

May 21, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..