टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांसंदर्भात शालेय शिक्षण मंत्रालयानं मोठी घोषणा केलीय. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय.
10 वी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार असून 12 वी परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे.
कोरोनाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय.
परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये, विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतुने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी व्हावा, या दृष्टीने एप्रिल-मे २०२१च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे
मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.
या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. तसेच अन्य यंत्रणेने छपाई केलेले आणि व्हॉट्सॲप किंवा सोशल मिडियाद्वारे व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
इयत्ता १० वीची परीक्षा केव्हा?
इयत्ता दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ च्या दरम्यान घेतली जाईल. तर निकाल ऑगस्ट २०२१ च्या अखेरीस जाहीर केला जाणार आहे.
इयत्ता १२ वीची परीक्षा केव्हा?
इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ दरम्यान घेतली जाईळ. तर निकाल जुलै २०२१ च्या अखेरीस जाहीर केला जाईल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज