टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री स्वामी समर्थ नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या नुतन चेअरमनपदी रामचंद्र कापशीकर तर नुतन व्हाईस चेअरमन पदी ज्ञानेश्वर भगरे यांची निवड करण्यात आली.
तर लेंडवे चिंचाळे येथील श्री.सिध्दनाथ सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी धनंजय लेंडवे यांची निवड करण्यात आली आहे.
श्री स्वामी समर्थ नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मंगळवेढा तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या संस्थेची निवडणूक पी.सी.दुरगुडे तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था
मंगळवेढा तसेच सहाय्यक सह अधिकारी डी.एस.साळुंखे यांच्या उपस्थितीत 2022-23 ते 2027-28 या कालावधीसाठी चेअरमनपदी रामचंद्र कापशीकर तर व्हाईस चेअरमनपदी ज्ञानेश्वर भगरे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
यावेळी नुतन संचालकपदी प्रभाकर हरिपंत कुमठेकर, संजय मधुसुदन कुलकर्णी, शिवाजी रामचंद्र सुरवसे, जयंत वामन पागे, छत्रगुण रामचंद्र माळी, विनायक जगन्नाथ मंगसुळे, इंदुमती आबासाहेब चेळेकर,
राणी सुर्यकांत ठेंगील, साधना दत्तात्रय कुलकर्णी आदिंची निवड करण्यात आल्याची घोषणा सहाय्यक सह अधिकारी डी.एस.साळुंखे यांनी संस्थेच्या सभागृहात शुक्रवार दि.20 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता केली.
यावेळी व्यवस्थापिका विद्या मंगसुळे, दत्तात्रय चेळेकर, शिवदास गोरे, स्वप्निल भगरे आदि उपस्थित होते. दरम्यान नुतन चेअरमन रामचंद्र कापशीकर यांचा सत्कार जेष्ठ नुतन संचालक शिवाजी सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आला.
तर नुतन व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर भगरे यांचा सत्कार नुतन जेष्ठ संचालक प्रभाकर कुमठेकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सहाय्यक सह.अधिकारी डी.एस.साळुंखे यांचा सत्कार नुतन चेअरमन रामचंद्र कापशीकर यांच्या हस्ते करण्यात आला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज