mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 4, 2023
in राज्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सहकुटुंब शासकीय महापूजेला हजर राहणार; किती वाजता असणार पूजा? जाणून घ्या शेड्यूल

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता सरकार पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाला मागस सिद्ध करण्याकरता इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम चालू असून राज्यपातळीवर कुणबीच्या नोंदीही तपासल्या जात आहेत.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जिल्ह्याधिकाऱ्यांसह बैठक घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी विभागाने भाडेतत्वावर जागा घेऊन तातडीने वसतीगृहे सुरू करण्याचे निर्देश देऊन त्याबाबतचा दर आठवड्याला अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

‘महानगर असलेल्या मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रति वर्ष प्रति विद्यार्थी ६० हजार रुपये निर्वाह भत्ता, विभागीय ठिकाण, विभागीय मुख्यालय व ‘क’ वर्ग महापालिका असलेल्या जिल्ह्यांमध्ये

प्रति वर्ष ५१ हजार रुपये निर्वाहभत्ता देण्यात येणार असून अन्य जिल्ह्यांच्या ठिकाणी ४३ हजार रुपये निर्वाहभत्ता तर तालुक्याच्या ठिकाणी ३८ हजार रुपये निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे’, अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य शासन गांभीर्याने कार्यवाही करीत आहे. त्यासाठी आता मराठवाड्यासह राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून कुणबी नोंदी तपासण्यासाठी युद्धपातळीवर मोहिम हाती घ्यावी.

त्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी आणि त्यांच्या नियंत्रणाखाली कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून द्यावी. त्यांना आवश्यक ते मनुष्यबळ, साधनसामुग्री देखील तातडीने देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

मंत्रालयस्तरावर अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त आणि जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी याबाबत संनियंत्रण करतील’, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संबंधित बातम्या

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

शेतकऱ्यांनो! ट्रॅक्टर-बैलगाडी आता कोणीच अडवणार नाही; शेतीकामांसाठी मुरूम, वाळू, दगड मोफत

July 3, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

कामाची बातमी! ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; मोफत राहणे, खाणे आणि १००% नोकरीची हमी; ‘प्रथम फाउंडेशन’ व पंचायत समितीचा मोठा पुढाकार

July 2, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सिंघम रिटर्न! FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा दणका; बाजारपेठेतून सुटे तेल गायब, बनावट दूध, पनीर विक्रेते रडारवर; डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; भेसळखोरांचे धाबे दणाणले

July 2, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकऱ्यांच्या जीवनात नवा प्रकाश! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ऐतिहासिक मोठी घोषणा; शेतकऱ्यांचा ‘हा’ मोठा त्रास आता कायमचा संपणार?

July 2, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

शेतजमीन नसली, तरीही राबणारी महिला ‘शेतकरी’च; महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर; कोणाला मिळेल दर्जा? कुठे करावा अर्ज?

July 2, 2026
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

हे यमराजा, उद्या आमच्या बायका येतील पण…;  वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला नक्की काय घडलं? पुरुषांनी फोडला हंबरडा; ज्याची चर्चा आता संपूर्ण राज्यात आहे?

June 29, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

तिकडे NEET चा बाजार, इकडे TET चा तमाशा; गरिबांच्या पोरांनी फक्त फी भरायची का? प्रहारच्या राकेश पाटीलांचा संतप्त सवाल; टीईटी’ परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

June 28, 2026

कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार? राज्य सरकारची मोठी घोषणा; थेट तारीख सांगितली

June 30, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिला शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! जमीन नसतानाही शासकीय योजनांचा लाभ मिळणार

June 27, 2026
Next Post
भाजप खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भातील कागदपत्रांची फेर चौकशी होणार; निकाल येईपर्यंत लोकसभेचा कालावधी संपू शकतो?

सोलापूरच्या खासदारांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; जाणून घ्या नेमकं कारण

ताज्या बातम्या

मोठा दिलासा! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटींच्या पॅकेजची ठाकरे सरकार कडून घोषणा

मंगळवेढ्यात खळबळ! नामांकित शाळेच्या प्रवेशद्वारावरच मध्यरात्री ‘अघोरी पूजा’; संशयिताविरुद्ध पोलिसांत तक्रार

July 3, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सभापती दीपाली ताड यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! मंगळवेढा तालुक्यातील ७ जिल्हा परिषद शाळांना मिळाले नवीन शिक्षक; ​पालक वर्गातून व्यक्त होतोय आनंद

July 3, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

वटपौर्णिमेलाच सुहासिनीचा कुंकवाचा धनी हिरावला! ८ दिवसांत बेकायदा दारू विक्री बंद करा; अन्यथा महिला दारू धंद्यावर जाऊन बाटल्या फोडणार

July 3, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

कोर्टाच्या चकरा मारण्यापासून सुटका! मंगळवेढा दिवाणी न्यायालयात ‘विशेष लोकअदालत’; वाद मिटवण्याची मोठी संधी

July 3, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

शेतकऱ्यांनो! ट्रॅक्टर-बैलगाडी आता कोणीच अडवणार नाही; शेतीकामांसाठी मुरूम, वाळू, दगड मोफत

July 3, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

कामाची बातमी! ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; मोफत राहणे, खाणे आणि १००% नोकरीची हमी; ‘प्रथम फाउंडेशन’ व पंचायत समितीचा मोठा पुढाकार

July 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा