मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांना आता ग्रामीण भागात 50 हजारांचे अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा निर्णय घेतला असून, बजेटमध्येही त्याबाबत तरतूद केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.
ग्रामीण भागात घरकुलासाठी 2 लाख 10 हजार रुपयापर्यंत निधी मिळणार आहे. अतिरिक्त अनुदानाचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे गोरे म्हणाले.
वर्षभरात 20 लाख घरकुलांचे काम पूर्ण करण्याचा सरकारचा संकल्प
वर्षभरात 20 लाख घरकुलांचे काम पूर्ण करण्याचा सरकारचा संकल्प असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. प्रत्येकाच्या स्वप्नातलं छान घर उभा राहणार असल्याचेही गोरे म्हणाले.
धाराशिव येथील कार्यक्रमात जयकुमार गोरे बोलत होते. पहिल्या टप्प्यातील 10 लाख घरकुलांचा पहिला हप्ता अमित शाहा यांच्या उपस्थितीत कालच वितरित झाल्याचे गोरे म्हणाले.
45 दिवसात आम्ही 100 टक्के घरांना मान्यता दिली
महाराष्ट्र राज्याला देशातील सर्वात मोठं घरकुलांचं उद्दीष्ट मिळालं आहे. 20 लाख घरांचे उद्दीष्ट राज्याला मिळालं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला होता असे जयकुमार गोरे म्हणाले. 100 दिवसांचा जो कार्यक्रम दिला होता, त्यामध्ये पहिल्या 45 दिवसात आम्ही 100 टक्के घरांना मान्यता दिली आहे.
यामध्ये आम्ही 10 लाख 34 हजार घरांना पहिला हप्ता देखील आपण वितरीत केला असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले. येणाऱ्या 15 दिवसात राहिलेल्या 10 लाख घरांना आम्ही हप्ता देऊन काम सुरु करणार असल्याचे गोरे म्हणाले. वर्षभरात आम्ही 20 लाख घरकुले बांधणार असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले. 100 टक्के रिझल्ट यावा असे काम सुरु केले आहे.
सगळ्यांना याबाबतच्या सूचना दिल्या असल्याचे गोरे म्हणाले. घरांच्या किंमतीमध्ये ग्रामीण भागात वाढ करण्यात आऐली आहे. आम्ही जे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याची माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.
प्रधान मंत्री आवास योजना सरकारच्या सर्वांसाठी घरे या मिशन अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करून भारतातील घरांची कमतरता दूर करण्याचे लक्ष्य ठेवते.
पीएमएवाय कार्यक्रम मागणी-आधारित दृष्टिकोनाचा अवलंब करतो ज्या अंतर्गत राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना विशिष्ट निकषांवर आधारित मागणी सर्वेक्षणाद्वारे ओळखल्या गेलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी प्रकल्प मंजूर करण्याचा अधिकार दिला जातो.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज