टीम मंगळवेढा टाईम्स। समाधान फुगारे
कचरेवाडी गावचे सुपुत्र व संगम विद्यालय डोंगरगावचे कर्मचारी प्रभू जयवंत काळुंगे सर यांचा आज दि.1 जून रोजी सकाळी 10 वाजता सेवापूर्ती सत्कार समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती विठाई परिवार मल्टिस्टेट बँकेचे चेअरमन स्वप्नील काळुंगे यांनी दिली आहे.
खोमनाळ रोड येथील शिवसमर्थ मंगल कार्यालयात हा सोहळा आयोजित करण्यात आला असून आमदार समाधान दादा आवताडे व धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे येथील नोंदणी उपमहानिरीक्षक अभयसिंह मोहिते साहेब हे असणार आहेत.
याप्रसंगी माजी शिक्षणाधिकारी ज्ञानदेव जावीर, गटविकास अधिकारी योगेश कदम, नानासाहेब उन्हाळे, गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता, शिक्षण विस्तार अधिकारी बिभीषण बेदरे, शिक्षक नेते सुरेश पवार,
माजी केंद्र प्रमुख विठ्ठल काळुंगे, दामाजी शुगरचे संचालक गोपाळराव भगरे, कचरेवाडीचे सरपंच लताबाई आवताडे, सांगोल्याचे उद्योजक सुभाष दिघे, प्राथमिक शिक्षण पतसंस्था चेअरमन विठ्ठल ताटे आदीजन उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, कार्यक्रमास येताना शाल, फेटा, हार, बुके ऐवजी शैक्षणिक साहित्य यांचा स्विकार केला जाईल असे जाहीर करण्यात आले आहे.
प्रभू जयवंत काळुंगे यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन विठाई परिवार मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मंगळवेढा व काळुंगे परिवार, कचरेवाडी यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज