टीम मंगळवेढा टाईम्स।
वयोगट शून्य ते पाच वर्षाचा बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात पोलिओ डोस केंद्र सज्ज झाली आहेत.
सध्या कोरोना लसीमुळे वॅक्सिनचं महत्व वाढलंय आणि सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव देखील कमी झाला असल्यानं आज पोलिओचे ‘दो बूंद’ आपल्या बालकांना द्यावेत असं आवाहन केलं जात आहे.
पल्स पोलिओ लसीकरण दिवसाच्या निमित्ताने राज्यातील पाच वर्षाच्या आतील कोणतेही बालक या लसीकरणाच्या अभियानापासून वंचित राहू नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
मंगळवेढा शहरात व गावपातळीवर आरोग्य सेवक, सेविका आशा स्वयंसेविका या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. मुबलक लससाठा प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहे.
मोबाईल टीम सज्ज
आज होणाऱ्या लसीकरण मोहिमेतून ग्रामीण भागात सुटलेल्या बालकांना घरोघरी जावून पोलिओ लस पाजण्यात येणार आहे. पोलिओ लसीपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
मोबाईल टीमद्वारे कामगार, भटके लोक, रस्त्यावरील मजुरी करणाऱ्यांची मुले यांना पोलिओचे डोस पाजण्यात येणार आहेत.
मंगळवेढा शहरात ‘या’ बुथवर मिळणार पोलिओ डोस
मंगळवारी शहरातील नगरपालिका शाळा नंबर 1 गणेश मंदिर जवळ, नगरपालिका शाळा नंबर 3 शनिवार पेठ, रतनचंद शहा बँकेजवळ मोडक बालवाडी, नगरपालिका शाळा नंबर 4 नागणेवाडी, नगरपालिका शाळा नंबर 5 साठे नगर, मंगळवेढा एस टी स्टँड, ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा,
रामलिंग मंदिर मंगळवेढा, मारुती मंदिर शनिवार पेठ मंगळवेढा, गैबीपीर दर्गा मंगळवेढा व त्यासोबत मोबाईल टीम कार्यरत राहणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज