टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर येथील मजरेवाडी ते अमन चौक रस्त्यावर वाळू टेम्पो अडवल्याप्रकरणी वाळू माफियांनी पोलीसांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.(Police pushed by sand mafia in Solapur)
जकप्पा सिद्राम कांबळे , राकेश जक्कप्पा कांबळे , मनोज जकप्पा कांबळे ( सर्व रा . बालाजी हौसिंग सोसायटी , कुमठा नाका ) , महिबुब अल्लाद्दीन नदाफ ( रा.मुपो कुरघोट , ता . दक्षिण सोलापूर ) असे आरोपींची नावे आहेत.
विजापूर नाका पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई लखन धर्मा माळी हे त्यांच्या इतर सहकाऱ्यांसमवेत गस्त घालत असताना , अमन चौक वाळू वाहतुकीचा टेम्पो अडवला . त्यावेळी वरील आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज