टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथील रेल्वेचे सहाय्यक विभागीय अभियंता हरप्रसाद दीक्षित यांच्या बंद बंगल्यामध्ये सोने चांदी व रोख रक्तम अशी बारा लाखाच्या चोरीचा २४ तासाच्या आत तपास करण्यात कुर्डुवाडी पोलीसांना यश आले असून आज यातील सर्व चार आरोपींना अटक केली आहे.
करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हीरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे व त्यांच्या सहकायांनी मोठ्या शिताफीने चोरांना पकडले असून आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
आरोपी हे कुर्डुवाडीतीलच आहेत यामध्ये राकेश सुर्यकांत सोनसाळे , शरद बापू चव्हाण , विक्रम उर्फ सनी महादेव खवळे , व अभिषेक दिपक कांबळे यांचा समावेश आहे. या चारही आरोपीकडे अद्याप कसलाच मुद्देमाल सापडला नसून उद्या त्यांना कोर्टात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.
Kurduwadi police successfully nab four accused in 24 hours
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज