टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील प्रहार संघटनेने बालाजीनगर येथील पोलीस पाटील हा बोगस डॉक्टरकीचा व्यवसाय डोणज येथे करीत आहे. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही व
मंगळवेढा न.पा चे मुख्याधिकारी यांनी दामाजी चौकातील मुरूम चोरावर गेली दोन वर्षे झाली कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे त्यांच्या विरोधात प्रहार संघटनेचे धरणे आंदोलन सुरू होते.
परंतु याची दखल मंगळवेढा उपविभागीय अधिकारी घेत नसल्यामुळे आंदोलनात बदल करून आजपासून अर्धनग्न बेमुदत आंदोलन करीत असल्याचे निवेदन मंगळवेढा उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.
या आंदोलनात प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी, प्रहार संघटनेचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे ,प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील , प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष संजय राठोड ,
अपंग क्रांतीचे तालुका उपाध्यक्ष व रड्डे ग्रामपंचायत सदस्य रोहिदास कांबळे ,शहराध्यक्ष युवराज टेकाळे ,शहर उपाध्यक्ष अक्षय सुर्यवंशी,सर्जेराव पाराध्ये ,धनंजय माने ,आशिष पवार, सुहास धुमाळ हे आंदोलनात सहभागी आहेत.
या आंदोलनाची यापुढे तीव्रता वाढवणार असल्याचे आंदोलन करते सिदराया माळी यांनी सांगितले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज