mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दोन हजार व पाचशे रुपये मूल्याच्या नकली नोटा छापणारी टोळी पकडली; पंढरपुरातील एकजण ताब्यात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 13, 2021
in क्राईम, सोलापूर
संतापजनक! मंगळवेढ्यात जन्मदात्या आईनेच केला मुलीचा खून

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कुठलीही छपाईची आधुनिक यंत्रसामग्री न वापरता फक्त लॅपटॉप आणि कलर प्रिंटरच्या सहाय्याने दोन हजार व पाचशे रुपये मूल्याच्या नकली नोटा छापणारे रॅकेट पिंपरी चिंचवड पोलिसांनी उघडकीस आणले आहे.

सतत १८ दिवस पुणे, सातारा, मुंबई आणि पालनपूर (गुजरात) येथे तपास करून सहाजणांच्या या आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून ३२ लाख ३७ हजार रुपयांच्या नकली नोटा व इतर ऐवज असा ३२ लाख ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले.

बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश नकली नोटा वितरणासाठी आलेल्या या टोळीतील एकजण पकडला गेल्याने झाला. सहाजणांच्या या टोळीतील एकही स्थानिक नाही. एकेक सोलापूर,सातारा आणि ठाणे,तर बाकीचे तिघे गुजरातमधील आहेत.

गोरख दत्तात्रेय पवार (वय ३०, रा. भाळवणी, ता.पंढरपूर, जि. सोलापूर) असे या साखळीत पकडल्या गेलेल्या पहिल्या आरोपीचे नाव आहे.

ओटास्कीम, निगडी येथील स्मशानभूमीजवळ त्याला पकडण्यात आले. तेव्हा त्याच्याकडे पाच लाख ८६ हजाराच्या बनावट नोटा मिळून आल्या. त्याच्या चौकशीतून एकेक कडी जोडत या नोटांची छपाई करणाऱ्यापर्यंत पोलिस पोचले.

दरम्यान, त्यासाठी त्यांना पिंपरी चिंचवड, सोलापूर, सातारा, मुंबई ते गुजरात असा दोन राज्यांत सतत १८ दिवस तपास करावा लागला. विठ्ठल गजानन शेळके (वय ३८, ढेबेवाडी, ता. पाटण, जि. सातारा), जितेंद्र रंकनिधी पाणीग्रही (वय ३६, रा. नालासोपारा पूर्व), राजू ऊर्फ रणजितसिंह फतूभा परमार (वय ३८), जितेंद्र नटवरभाई पटेल (वय २६), किरणकुमार कांतीलाल पटेल (वय ३८, तिघेही रा. गुजरात) असे या टोळीतील इतर आरोपी आहेत.

दोन्ही पटेल हे लॅपटॉप व कलर प्रिंटर याच्या मदतीने दोन हजार व पाचशे रुपयांच्या नकली नोटा छापत होते. तर, बाकीचे आरोपी त्या चलनात आणत होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नकली नोटा

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! मोफत बियाणे मिळणार, पण ‘हा’ अहवाल देणे बंधनकारक; ऑनलाइन नोंदणी करावीच लागणार

June 16, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

मंगळवेढ्यात भरधाव कारचा थरार! यू-टर्न घेताना कारने दुचाकीला उडवले; शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत; नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत केले मदतकार्य

June 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मंगळवेढ्यात खळबळ! तुकाराम मुंढेंच्या धसक्याने स्वीट मार्टमधील मलाई, पेढा अन् पनीर गायब; मग आतापर्यंत नागरिक जे खात होते ते काय होतं?

June 15, 2026
मंगळवेढ्यात जुगार खेळणाऱ्या 17 जणांसह 21 जण पॉझिटिव्ह; रुग्णांची प्रशासनासोबत हुज्जत

​’डायल ११२’ वर एक कॉल अन् खेळ खलास! मंगळवेढ्यात चालणाऱ्या जुगारावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; ७ आरोपींसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

June 14, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

काळजाचा थरकाप! आधी पत्नी अन् २ पोटच्या मुलांना आयस्क्रीममधून विष दिलं, नंतर मुख्याध्यापकाची आत्महत्या; पोलिसांना सापडली २२ पानांची सुसाईड नोट

June 13, 2026
वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना विकले मीठ; मंगळवेढ्यात नामवंत कृषी केंद्राचा बोगस कारभार उघड; कृषी चालक व कंपनी संचालकावर गुन्हा दाखल

June 12, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

​राजेंद्र राऊतांच्या बैठकीला मविआचे आमदार हजर, पण भाजपचेच ‘परिचारक’ गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील 'हा' पोलीस कर्मचारी निलंबीत; पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांची कारवाई

ताज्या बातम्या

‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

महायुती सरकारचं मोठं पाऊल, ‘या’ शहरामध्ये सुरू होतेय देवाभाऊ टॅक्सी सेवा; स्वस्तात मस्त होईल प्रवास

June 16, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! मोफत बियाणे मिळणार, पण ‘हा’ अहवाल देणे बंधनकारक; ऑनलाइन नोंदणी करावीच लागणार

June 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

धक्कादायक! नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील

June 16, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

जिल्हा परिषद शाळा बळकटीकरणासाठी डोंगरगावच्या सुपुत्राचे स्तुत्य पाऊल; वीर इंटरनॅशनल अकॅडमीचा आज भव्य उद्घाटन सोहळा

June 16, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

मंगळवेढ्यात भरधाव कारचा थरार! यू-टर्न घेताना कारने दुचाकीला उडवले; शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत; नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत केले मदतकार्य

June 16, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

मंगळवेढा पोलीस ठाण्यात मोठे फेरबदल! ५ कर्मचाऱ्यांची बदली, तर ५ नवीन अंमलदार रुजू; पहा कोणाची कुठे झाली बदली?

June 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा