mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! पंढरपुरातील विठ्ठल मंदिर ‘या’ तारखेपासून दीड महिना बंद राहणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 12, 2024
in सोलापूर
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूरच्या विठ्ठलाचं चरणस्पर्श दर्शन 15 मार्चपासून दीड महिन्यांसाठी बंद राहणार आहे. विठ्ठलाच्या मंदिर गाभाऱ्याचं काम करण्यासाठी मंदिर प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

या काळात रोज सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत फक्त मुखदर्शन सुरू राहणार आहे. यामुळे 15 मार्चपासून देवाचे पायवरील दर्शन पुढील किमान दीड महिन्यासाठी पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

विठ्ठल मंदिराच्या 73 कोटीच्या विकास आराखड्याचे काम वेगात सुरू असून आता विठ्ठल व रुक्मिणी गाभाऱ्यात पुरातन रूप देण्याचे काम 15 मार्चपासून सुरू होणार आहे . यासाठी आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती , सल्लागार समिती आणि वारकरी संतांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.

त्यामुळे आता विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या लाखो विठ्ठल भक्तांना दुरून काचपेटीत असणाऱ्या देवाचे मुखदर्शन घ्यावे लागणार आहे. या संपूर्ण कालावधीत देवाच्या नित्योपचार वेळी काचपेटी काढून देवाचे नित्योपचार केले जाणार आहेत. 15 मार्च ते 17 मार्च या दोन दिवसात देवाच्या गाभाऱ्यात लावलेली चांदी इन कॅमेरामध्ये काढली जाणार आहे .

17 मार्चपासून गाभाऱ्यात लावलेली ग्रॅनाईट , मार्बल क्या फारशा काढून मूळ दगडी भिंती उघड्या केल्या जातील . यानंतर गाभाऱ्यातील मूळ काळा पाषाणावर आलेले सिमेंटचे थर काढण्यासाठी वाळूच्या प्रेशरने मारा करून मूळ दगडी रूप दिले जाणार आहे.

मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी काढण्या बाबत वारंवार आवाज उठवल्यावर नवीन आराखड्यात या कामाचा समावेश झाला होता .

आषाढी एकादशी पूर्वी या आराखड्यातील बहुतांश कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आता दीड महिना देवाच्या पयवरील दर्शन पूर्ण बंद केले जाणार आहे . त्यामुळे आता भाविकांना 30 फुटांवरून मुखदर्शन मिळणार आहे.

ज्ञानोबा तुकाराम आदी संतांच्या काळातील म्हणजे 700 वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर कसं असेल याची सगळ्यांनाच उत्कंठा लागून राहिली असली तरी लवकरच हे रूप जगभरातील विठ्ठल भक्तांना पाहायला मिळणार आहे.

पूर्ण मंदिरात आता पूर्वीच्याप्रमाणे दगडी फ्लोरिंग असणार आहे. यासाठी देगलूर येथील काळ्या पाषाणाच्या खाणीतून दगड आणला जात असून हे दगड घडविण्याचं काम रात्रंदिवस करण्यात येत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: विठ्ठल प्रतिष्ठान

संबंधित बातम्या

दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

फेरतपासणीत सोलापूर जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी राज्यात दुसरा, पुनर्मूल्यांकनात तीन विषयात वाढले ‘एवढे’ गुण; कुठेही क्लासेस न लावता मिळवले ९९.८० टक्के गुण

June 19, 2025
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

राग अन् भीक माग! पतीने कुऱ्हाडीने पत्नीला संपवलं आणि मुलांवरही वार; पंढरपूर हादरलं; धक्कादायक कारण आले समोर…

June 18, 2025
धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

मोठी खळबळ! सोलापुरचे डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणात मनिषाचा हादरवणारा मेल पोलीसांच्या हाती; आतापर्यंत काय काय झालं? जाणून घ्या

June 18, 2025
नोकरीची सुवर्णसंधी! थेट द्या मुलाखत आणि थेट घ्या मॉलमध्ये नोकरी; मंगळवेढ्यातील ‘खटावकर मॉल’ मध्ये विविध 40 जागांसाठी निघाली भरती; अधिक माहितीसाठी 9960110829 संपर्क साधा

नोकरीची सुवर्णसंधी! थेट द्या मुलाखत आणि थेट घ्या मॉलमध्ये नोकरी; मंगळवेढ्यातील ‘खटावकर मॉल’ मध्ये विविध 40 जागांसाठी निघाली भरती; अधिक माहितीसाठी 9960110829 संपर्क साधा

June 19, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी बातमी! यंदाही वारकऱ्यांना टोलमाफी, पंढरपूर पालखी मार्गावर टोल नाही; टोलमाफीचे स्टिकर्स मिळवण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय?

June 17, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शाळेचा पहिलाच दिवस ठरला शेवटचा… भावाला आणताना ट्रकची दुचाकीला धडक, बहिण-भावाचा मृत्यू; कुटुंब लोटले दुःखाच्या खाईत

June 17, 2025
मोठी प्रगती! धनश्री मल्टिस्टेटने अल्पावधीतच उमटवला बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे गौरवोद्गार

मोठी प्रगती! धनश्री मल्टिस्टेटने अल्पावधीतच उमटवला बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे गौरवोद्गार

June 16, 2025
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

सोलापूर जिल्ह्यात मध्यरात्री थरार! पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापूरमध्ये मध्यरात्री एन्काऊंटर

June 15, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

आषाढीसाठी ‘पंढरीच्या वारी’त येणाऱ्या दिंड्यांना मिळणार प्रत्येकी ‘एवढे’ हजार रुपये; वारकऱ्यांसाठी राबवला जाणार ‘हा’ उपक्रम; शासन आदेश निघाला

June 15, 2025
Next Post
शेतकऱ्यांनो! जनावरांच्या चाऱ्याची चिंता मिटली; उजनीतून शेतीसाठी सोडलेले पाणी ‘या’ तारखेपर्यंत राहणार; कालव्यातूनही शेतीला पाणी

मोठी खळबळ! मंगळवेढ्यातील 24 गावांतील शेतकऱ्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्यांनी दिली वेळ; महाराष्ट्र सरकार मात्र झोपलेलंच

ताज्या बातम्या

दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

फेरतपासणीत सोलापूर जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी राज्यात दुसरा, पुनर्मूल्यांकनात तीन विषयात वाढले ‘एवढे’ गुण; कुठेही क्लासेस न लावता मिळवले ९९.८० टक्के गुण

June 19, 2025
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

शैतानी वृत्ती! मदरशाला सुट्टी मिळावी म्हणून अल्पवयीन मुलाने केली मित्राची हत्या; तोंडांत बोळा कोंबून दिला इलेक्ट्रिक शॉक

June 19, 2025
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

बँकेच्या गेटवर गळफास! लेकीच्या लग्नासाठी ठेवीचे पैसे मिळेनात; चकरा मारुन थकलेल्या बापाचं टोकाचं पाऊल

June 19, 2025
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

राग अन् भीक माग! पतीने कुऱ्हाडीने पत्नीला संपवलं आणि मुलांवरही वार; पंढरपूर हादरलं; धक्कादायक कारण आले समोर…

June 18, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मराठी प्रेमींना सरकारचा गुलिगत धोका, तिसरी भाषा अनिवार्य; मागच्या दाराने ‘या’ भाषेची सक्ती कायम

June 19, 2025
धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

मोठी खळबळ! सोलापुरचे डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणात मनिषाचा हादरवणारा मेल पोलीसांच्या हाती; आतापर्यंत काय काय झालं? जाणून घ्या

June 18, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..