मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्यांची आत रोज नोंद होईल. संबंधित नागरिकाचे नाव, पत्ता अन् कामाचे स्वरूप यासंबंधी माहिती नोंदवहीत लिहिल्यानंतरच नागरिकांना प्रवेश मिळणार आहे.
याबाबत सूचना दिल्या आहेत. याची लवकरच अंमलबजावणी होईल, अशी माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.
तसेच ज्या कामासाठी नागरिक कार्यालयांमध्ये येतात, त्याचे काम झाले आहे की नाही, नसेल तर कशासाठी काम इतक्या दिवसांपासून प्रलंबित आहे,
कोणत्या विभागात काम प्रलंबित आहे, याची माहिती नोंदवहीद्वारे मिळणार आहे. एकाच कामासाठी नागरिकांना वारंवार येण्याची आवश्यकता पडू नये, याची काळजी यापुढे घेतली जाणार आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानुसार आता कार्यालय परिसरात येणाऱ्या नागरिकांची नोंद राहणार आहे.
तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध विभागामध्ये समन्वय ठेवण्यासाठी नोंदवही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
विशेष म्हणजे, सात दिवसांनंतर आलेल्या नागरिकांची संख्या तसेच त्यांच्या कामाचे स्वरूप आणि कामाचे पुढे काय झाले, यासंदर्भात अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.
तसेच आपले सरकार पोर्टल मार्फत ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या अर्जाचा निपटारा तात्काळ करण्यात येईल.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे स्वतः गावातील लोकांना फोन करून महसूल विभाग व इतर विभागांशी संबंधित कामांचा निपटारा होत आहे का? याची विचारणा करणार आहेत.
त्याचबरोबर तहसील कार्यालय, सर्कल ऑफिस व तलाठी ऑफिस येथे क्यूआर कोड लावला जाणार, त्या द्वारे प्रश्नावली दिली जाईल, व कामांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.
एजंटगिरी करणाऱ्यांना बसणार चाप
दरम्यान, काही व्यक्ती काम नसताना तहसील कार्यालय परिसरात फिरतात. एजंटगिरी करतात विनाकारण चकरा मारत असतात आशा लोकांना चाप बसणार आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज