mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महाविद्यालये केव्हा सुरू होणार ? मंत्री उदय सामंत यांची दिली महत्त्वाची माहिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 10, 2021
in शैक्षणिक
शिक्षकांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या लढ्याला पहिले यश, शिक्षक भरतीवरील स्थगिती शासनाने उठवली

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्रातील नववी ते बारावीचे वर्ग नोव्हेंबरपासून सुरू झाल्यानंतर आता महाविद्यालयेही लवकरच सुरू करण्याचे सुतोवाच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केले.

राज्यातील परिस्थितीचा जिल्हाधिकाऱ्यामार्फत आढावा घेऊन विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्याविषयीचा निर्णय 20 जानेवारीपर्यंत घेण्यात येईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.

महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी जिल्ह्याधिकारी, विद्यापीठांचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून तेथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल.तसेच प्रत्येक जिल्ह्यातील वसतिगृहांची तपासणी, क्वारंटाईन सेंटरसाठी देण्यात आलेल्या महाविद्यालयांची सद्यस्थिती याची पाहण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाविद्यालयात येणारे विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकेतर कर्मचार्यांची सुरक्षा, त्यांचे आरोग्य याला सर्वप्रथम प्राधान्य असल्याचे सांगून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांसाठी वेगळी नियमावली तयार करण्याचा विचारही सुरू असल्याचे यावेळी उदय सामंत म्हणाले.

यावेळी त्यांनी प्राध्यापक, प्रायार्य भरती, महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेशप्रक्रियेतील अडथळे याविषयांवरही संवाद साधला.

मुंबईत पंडित ह्दयनाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यात येणार असून त्यासाठी ज्येष्ठ संगीतकार पंडीत ह्दयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली.

संगीत महाविद्यालय उभारण्यासंबंधीचे सर्व निर्णय मंगेशकर समिती घेणार असून लवकरच या समितीतील सदस्यांची घोषणा ह्दयनाथ मंगेशकर करतील, असेही सामंत म्हणाले.

प्रत्येक जिल्ह्यात मुक्त विद्यापीठ

राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार असून गोवा राज्यात मुक्त विद्यापीठाची शाखा सुरू करण्याविषयी मुख्यमंञी प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा सुरू असल्याचेही उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

सध्या पुणे, नागपूर, रत्नागिरी, अमरावती, सोलापूर, नांदेड सह राज्याच्या सीमाभागातही मुक्त विद्यापीठ केंद्र सुरू होणार आहे.

संवादातील महत्वाचे निर्णय

प्राचार्याची 260 तर विद्यापीठातील 49 संवैधानिक पदे भरण्याचा निर्णय; लवकरच अंमलबजावणीदेखील होणार

तांत्रिक अडचणी पाहता विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास 11 व 12 जानेवारीपर्यंत वाढीव मुदत.तंञशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासही 15 जानेवारीपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुक्त विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनाही सातवा वेतन आयोग लागू.गोंडवाना विद्यापीठात अत्याधुनिक डेटा सेंटर उभारण्यास परवानगी.गडचिरोली, चंद्रपूरसारख्या दुर्गम भागात मॉडेल कॉलेज होणार.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Join WhatsApp Group for Latest News

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: महाविद्यालय

संबंधित बातम्या

दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

February 27, 2021
शिक्षकांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या लढ्याला पहिले यश, शिक्षक भरतीवरील स्थगिती शासनाने उठवली

1 मार्चपासून शाळा बंद की चालू? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांबाबत केली मोठी घोषणा

February 26, 2021
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ‘या’ पध्दतीने होणार, एप्रिल पासून सुरुवात

February 26, 2021
महत्वाची बातमी! आजपासून ‘हे’ नियम बदलले, थेट आपल्या खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या

महिलांनो! मोदी सरकारच्या ‘या’ कल्याणकारी योजना तुमच्यासाठी, घरबसल्या घ्या लाभ

February 22, 2021
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

विद्यार्थ्यांनो! 10वी-12वीच्या परीक्षे दरम्यान एका वर्गात ‘एवढे’ विद्यार्थी बसणार; परीक्षा केंद्रांची संख्या वाढण्याची शक्‍यता

February 20, 2021
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

आनंदाची बातमी! दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणांसदर्भात दिलासादायक निर्णय

February 19, 2021
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! दहावी-बारावी बोर्ड परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

February 17, 2021
सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर, ‘या’ तारखेला होणार गावनिहाय आरक्षण

कॉलेजकुमारांनो! महाविद्यालय ‘या’ तारखेपासून सुरू होणार, परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन?

February 4, 2021
अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

GOOD NEWS! होतकरु तरुणांसाठी ठाकरे सरकार देणार ‘एवढ्या’ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

February 3, 2021
Next Post
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

उजनी जलाशयाचा पाणीसाठा आजअखेर 'एवढे' टक्के, उन्हाळ्यात पिकांसाठी पाण्याची कमतरता भासणार ?

ताज्या बातम्या

दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

February 27, 2021
शिवसेना महिला आघाडीच्या शैला गोडसे यांच्या मंगळवेढ्यातील संपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन

शिवसेना महिला आघाडीच्या शैला गोडसे यांच्या मंगळवेढ्यातील संपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन

February 27, 2021
पंढरपूर ब्रेकिंग! कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन तीन दिवस बंद राहणार

विठ्ठल भक्ती! माघी यात्रेत प्रवेश बंदी होती, भक्तांची विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीला ‘एवढ्या’ लाखांची देणगी

February 27, 2021
मंगळवेढा ब्रेकिंग! पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची मंगळवेढा शहरासाठी मोठी घोषणा

मंगळवेढा ब्रेकिंग! पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची मंगळवेढा शहरासाठी मोठी घोषणा

February 26, 2021
समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

समाधान आवताडे यांची उमेदवारी फिक्स! ‘या’ पक्षात प्रवेश करण्याची शक्यता?

February 26, 2021
शिक्षकांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या लढ्याला पहिले यश, शिक्षक भरतीवरील स्थगिती शासनाने उठवली

1 मार्चपासून शाळा बंद की चालू? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांबाबत केली मोठी घोषणा

February 26, 2021
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

Join WhatsApp Group for Latest News