टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्य शासनाने हाती घेतलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक दाखले आणि अर्ज भरण्यासाठी महिलांची अलोट गर्दी होत असताना
महा-ई-सेवा केंद्र म्हणून मान्यता नसताना काही नेट कॅफेचालकांनी महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी धंदा मांडला आहे. याप्रकरणी प्रशासनाने दोन नेट कॅफेचालक व मालकांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील सात रस्ता भागातील प्रगती नेट कॅफे आणि योगेश्वर नेट कॅफे अशा दोन ठिकाणी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी सरिका कल्याण वाव्हळ यांनी खातरजमा केली असता
तेथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरून घेताना कोणतेही शुल्क आकारणे अपेक्षित नसताना महिलांकडून शंभर रूपये ते दोनशे रूपयांची रक्कम उकळली जात असल्याचे आढळून आले.
महा-ई-सेवा केंद्र म्हणून अधिकृत मान्यता नसताना या दोन्ही नेट कॅफेंमध्ये घडत असलेला प्रकार शासनाची दिशाभूल आणि फसवणूक करणारा असल्यामुळे त्याबद्दल तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात आली.
सदर बझार पोलीस ठाण्यात संबंधित दोन्ही नेट कॅफेचालक व मालकांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज