टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप 2024 ची ट्रॉफी जिंकली आणि 11 वर्षांचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. फायनलमध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले.
भारतीय संघाच्या या ऐतिहासिक यशानंतर बीसीसीआयने संघावर पैशांचा वर्षाव करत 125 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
टीम इंडियाला आयसीसीकडून बक्षिसाची रक्कम तर मिळालीच पण बीसीसीआयने 125 कोटी रुपयांचे वेगळे बक्षीसही जाहीर केले. आता टीम इंडियामध्ये 125 कोटींची वाटणी झाली आहे. खेळाडूंपासून ते सिलेक्टरपर्यंत कोणाला किती पैसे मिळणार हे जाणून घेऊया.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सर्व 15 खेळाडू आणि राहुल द्रविड यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळणार आहेत. याशिवाय उर्वरित कोचिंग स्टाफला प्रत्येकी 2.5 कोटी रुपये मिळतील.
तर बाकीच्या स्टाफला प्रत्येकी 2 कोटी रुपये मिळतील. निवड समितीच्या प्रत्येक सदस्याला प्रत्येकी एक कोटी रुपये मिळणार आहेत. रिंकू सिंग आणि शुभमन गिल या खेळाडूंसह राखीव गटातील खेळाडूंनाही प्रत्येकी एक कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
भारतीय संघाने 13 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बार्बाडोसमध्ये इतिहास रचला. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला.
टीम इंडिया प्रत्येक वेळी उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत हरली. याच कारणामुळे या वेळी जेव्हा संघाने अंतिम सामना जिंकला तेव्हा संपूर्ण देशांनी जल्लोष केला.
भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर 2007 प्रमाणे विजयाची परेड मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे एका खुल्या बसमध्ये झाली आणि त्यादरम्यान लाखो चाहते उपस्थित होते.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरही एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यादरम्यान स्टेडियम पूर्णपणे खचाखच भरले होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज