मंगळवेढा टाइम्स न्युज ।
भगीरथ भालके यांना घरकुलाची कागदपत्रे काय असतात ते विचारले तर दोन दिवस त्यांना सुचनार नाही, इतका मागासलेला उमेदवार आहे असा घाणाघात अशोक चौंडे यांनी केला.
चौंडे पुढे बोलताना म्हणाले की, भालके यांना विकास म्हणजे कसा करावा हे समजायला वीस वर्षे लागतील.
त्यामुळे जनतेने समाधान आवताडे यांना निवडून द्यावे अतिशय हुशार विकास पुरुष असून दोन वर्षांनी होणारे काम ते एका महिन्यात करण्याची त्यांची कुवत आहे.
जनतेने भावनिक न होता आपल्या गावाचा विकास कोण करू शकतो? भरगच्च असा निधी विकास करण्यासाठी कोण देऊ शकतो याचा विचार करायला हवा.
भगीरथ भालके हे फक्त केवळ स्टेजवर बोलू शकतात, त्यांना कामाचा एकही अनुभव नाही, निवडणूक झाली हरल्यानंतर परत निवडून येण्यासाठी पुढच्या निवडणुकीपर्यंत कसलाही प्रयत्न करत नाही असा टोला देखील चौंडे यांनी लगावला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज