mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून ‘यांची’ उमेदवारी जवळपास निश्‍चित

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 11, 2020
in सोलापूर
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

टीम मंगळवेढा टाईम्स ।

आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाने रिक्त जागी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीतून संचालक भगीरथ भालके यांच्या नावाला कार्यकर्त्यांचा दबाव वाढत असताना, विरोधी गटाच्या भूमिकेकडे राजकीय निरीक्षकांसह मतदारांचे लक्ष लागले आहे.

तालुक्‍याचे नेतृत्व करणाऱ्या पूर्वीच्या नेतेमंडळींनी राजकारण करताना शेतीच्या पाण्याचा व विकासाचा प्रश्न रखडत ठेवला. हेच प्रश्न हेरून आमदार भारत भालके यांनी 2007 पासून जनसंपर्क वाढवत शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या रखडलेल्या प्रश्नांसाठी शेतकऱ्याचा मुलगा विधानसभेत गेला पाहिजे,

या दृष्टीने तयारी केल्याने 2009 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांचा पराभव केला व विधानसभेत पोचले.

मंगळवेढा तालुक्‍यातील अनेक प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठवत अशक्‍य असणाऱ्या 530 कोटींच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळवली.

म्हैसाळ योजनेची रखडलेली कामे मार्गी लावली, शिरनांदगी तलावात पाणी सोडले, 40 गावांची भोसे प्रादेशिक योजना, प्रांत कार्यालय, विविध कार्यालयांना मंजुरी व उभारणीसाठी निधी, रस्ते, पूल, बंधारे, राज्यातील सर्वाधिक तीर्थक्षेत्र विकास निधी, बसवेश्वर स्मारक, चोखामेळा स्मारक उभारणी निधीसाठी पाठपुरावा, पीकविमा यासह अनेक विकासकामे त्यांनी मार्गी लावली.

विद्यमान सरकारकडून 35 गाव योजनेला निधीची देखील तरतूद करून घेत असताना त्यांचे अकाली निधन झाल्याने मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला.

त्यांच्या निधनाने तालुक्‍याच्या विकासावर परिणाम होणार असल्याने त्यांच्या समर्थकांनी आपले दुःख बाजूला ठेवत सरकोलीतील भालके यांच्या निवासस्थानी जाऊन भगीरथ भालके यांची भेट घेतली व त्यांच्या निधनामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे,

ती भरून काढावी, आमचे नेतृत्व स्वीकारत व कुटुंबकर्ता म्हणून पालकत्व स्वीकारावे, यासाठी आम्ही सर्वजण पाठीशी राहू, अशी भावना व्यक्त केली.

(कै.) आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग येऊ लागला आहे. स्व. भालके यांचे शरद पवार यांच्यावरील प्रेम पाहता त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आमची असून, आम्ही योग्य वेळी न्याय देऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूचित केल्याने राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित मानली जात आहे.

परंतु या मतदारसंघात ही जागा भाजपकडे असून 2014 मध्ये भाजपने ही जागा स्वाभिमानीला देऊ केली तर 2019 ला रयत क्रांती पक्षाला देऊ केली. पण पोटनिवडणुकीत भाजपची भूमिका काय असणार, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपकडून या मतदारसंघाची जबाबदारी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर आहे तर आमदार प्रशांत परिचारक व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याने, या मतदारसंघाच्या भाजप उमेदवार व निवडणूक लढविण्याविषयी मात्र या दोघांची भूमिका विचारात घेतली जाणार आहे

तर या मतदारसंघात दोन वर्षांपूर्वी आमदारकीची संधी मिळावी म्हणून तत्कालीन मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून शैला गोडसे यांनीसुद्धा प्रयत्न केले होते. परंतु शिवसेना-भाजप युती जागा भाजपकडे गेल्यामुळे त्यांना थांबावे लागले.

सध्या मात्र शिवसेना आणि भाजपची ताटातूट झाली आहे, त्यामुळे या पोटनिवडणुकीत या सर्व इच्छुकांची भूमिका मात्र निर्णायक ठरणार आहे. (सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उमेदवारपोटनिवडणुकभगीरथ भालकेमंगळवेढा पंढरपूर मतदारसंघराष्ट्रवादी काँग्रेस

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आ.समाधान आवताडेंचा धडाका! मंगळवेढ्याला म्हैसाळचे, तर पंढरपूरला कॅनॉलद्वारे मिळणार पाणी; वीज पुरवठाही ८ तास होणार

July 10, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हट्टापायी पोटचा मुलगा गेला…; सांगोल्यातील ‘या’ घटनेने पालकांचे डोळे उघडले, नक्की वाचा काय घडलं?

July 8, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

मंगळवेढ्यातील १ लाख ९९ हजार मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! २००२ च्या यादीत नाव नसेल तर ‘या’ कागदपत्रांशिवाय पर्याय नाही

July 7, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

गुन्हेगारांनो सावधान! सुधारा, नाहीतर थेट कारवाई..; पोलिसांची सिंघम स्टाईल ॲक्शन; पोलीस अधीक्षकांनी गुंडांना बोलावून भर चौकात दिला सज्जड दम; लिहून घेतले हमीपत्र

July 7, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूर जिल्ह्याची चिंता मिटली! हवामान खात्याच्या ‘या’ अंदाजाने उजनी धरणाच्या पाणीपातळीत होणार मोठा चमत्कार?

July 7, 2026
Next Post
शेतकऱ्यांनी लक्ष द्या! वारसनोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

पोटहिस्स्यानुसार होणार स्वतंत्र सातबारा; आता शेतजमिनीसाठी होणाऱ्या भांडणांना पूर्णविराम

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा