टीम मंगळवेढा टाइम्स।
मंगळवेढा येथील शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये रविवार दि.9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत भव्य शिबाराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालक डॉ.शरद शिर्के यांनी दिली आहे.
मुळव्याध-भगंदर व इतर विकारांवरील तसेच बालरोगतज्ञ व सर्जरी विभागाचे भव्य मोफत शिबीर होणार आहे.
आयुर्वेदिक एम.डी.डॉ.श्रीकांत अवधुतराव व एम.एस शल्य डॉ.उषा अवधुतराव, डॉ.सुशांत माने हे शल्य चिकित्सक असून ते आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करणार.
तर डॉक्टर कोडलकर हे जनरल सर्जन असून ते अपेंडिक्स हर्निया हायड्रोसील आतड्याचे आजार, शरीरावरील अनेक प्रकारच्या गाठी, स्तनातील गाठी इत्यादी तपासणी मोफत करणार आहेत.
शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नागरिकांच्या आरोग्यविषयक अनेक शिबिरे ही मोफत घेतली जात आहेत.
उद्या होणाऱ्या शिबिरास सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रशासनाने केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज