टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा ते मरवडे रोडवर फटेवाडी गावच्या हद्दीत प्रसाद देशमुख यांच्या शेतालगत लावलेली ६० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्याद प्रवीण विजय खवतोडे (रा.मंगळवेढा) यांनी दिली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ५ ते ५:३० वाजण्यादरम्यान घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की. फिर्यादी नगरसेवक प्रवीण खवतोडे हे मंगळवेढा ते मरवडे रोडवर फटेवाडी गावच्या हद्दीत प्रसाद देशमुख यांच्या शेतालगत
मोटारसायकल एम एच १३ डी डब्ल्यू ६४७७ लाऊन शेतीची पाहणी करत असताना अज्ञात चोरट्यांने चोरून नेली. अधिक तपास पोलिस नाईक विभूते करीत आहेत. लोकप्रतिनिधीची दुचाकी चोरीला गेल्याने चर्चा होत आहे.
कार-दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार
अज्ञात कारचालकाने भरधाव वेगाने कार चालवून मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने एकजण जागीच ठार तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला.
ही घटना १३ डिसेंबर रोजी १२.१५ वाजण्याचे सुमारास मौजे लोणविरे (ता.सांगोला) शिवारातील हॉटेल शुभम समोर घडली. या अपघातात चंद्रकांत रावसाहेब इंगोले (वय ५०, रा. खारटवाडी, ता. सांगोला) यांचा मृत्यू झाला आहे.
फिर्यादी सुरेश मधुकर इंगोले यांचा चुलत भाऊ चंद्रकांत रावसाहेब इंगोले (रा. खारवटवाडी, ता. सांगोला) हा रमेश जाधव यांचे मोटारसायकल क्रमांक एम.एच. ४५ / एम. २८२५ वरून कामानिमित्त सोनंद गावचे दिशेने जात होते.
दरम्यान, कडलास ते सोनंद रस्त्यावरील लोनविरे हद्दीत हॉटेल शुभम समोर आले असता समोरून येणाऱ्या कार गाडी नंबर एम. एच. १२/ एफ. यु. ०६७० या कारची जोराची बसल्याने मोटारसायकलस्वार रमेश जाधव हा गंभीर झाला
तर मागे बसलेले चंद्रकांत रावसाहेब इंगोले यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने ते जागीच मरण पावले. यावेळी कार चालक तेथून गाडी भरधाव चालवून सांगोल्याच्या दिशेने पळून गेला. याबाबत मयताचा चुलत भाऊ सुरेश मधुकर इंगोले याने अज्ञात कार चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज