mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला ‘हे’ गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 26, 2021
in मंगळवेढा
टेन्शन वाढले! मंगळवेढ्यातील ‘हा’ भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित; पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण मरवडे गाव पूर्णपणे सील करण्यात आले असून पुढील काही दिवस मरवडे गावात कडक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

मरवडे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या काळात फक्त जीवनावश्यक सेवा म्हणजे आरोग्य विषयक, कायदा आणि सुव्यवस्था राखणे,शासकीय सेवा सुरु राहतील, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मरवडे प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर झाल्याने मंगळवेढा पोलिसांनी नाकाबंदी करण्याचे काम हाती घेतले आहे. मरवडे मधील सर्व दुकानांसह भाजीपाला, मटण, चिकन मासे विक्रीही बंद राहणार आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातील गावांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेऊन कोणतीही व्यक्ती अत्यावश्यक सेवा वगळून इतर कामासाठी बाहेर येणार नाही किंवा जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश प्रांताधिकारी उदयसिंह भोसले आणि यांनी दिले आहेत.

प्रतिबंधीत क्षेत्राच्या नियमामुळे मरवडेसह इतर प्रतिबंधित झालेल्या गावातील नागरिकांना १ मे पर्यंत बाहेर जाता किंवा आत येता येणार नाही. नियमांचे काटेकोर पालन न केल्यास अधिक कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले आहेत.

यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना आणि त्यांच्या वाहनांना वगळण्यात आले आहे. जो कोणी या नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने देखील रोज किमान ५० घरांचा सर्वेक्षण करून बाधित रुग्णाच्या संपर्कातील आलेल्या व्यक्तीची यादी करून जवळपास २८ दिवस वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करावा, तसेच पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात करून सर्व आस्थापना पूर्ण बंद राहतील यासाठी सजग राहण्याच्या सूचना प्रांताधिकारी यांनी दिलेल्या आहेत.

या गावांमध्ये प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू केले असून गावातील लोकांना महत्त्वाचा कामाशिवाय गावाबाहेर पडता येत नसून बाहेरील लोकांनाही गावात प्रवेश बंद करण्यात आला आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर जरब बसवण्यासाठी गावात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्याच्या सूचना प्रांताधिकारी भोसले यांनी दिल्या आहेत

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोनामरवडे

संबंधित बातम्या

पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

June 10, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मंगळवेढ्यात थरार! पोलिसांना गुंगारा देऊन सब जेलमधून पळाला; पण पोलिसांच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने कर्नाटक गाठून ठोकल्या बेड्या

June 11, 2026
बळ वाढले! आ.समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांचे मनोमिलन; कारखान्याच्या हितासाठी पाठिंबा केला जाहीर

दोन बैठका, एकच उमेदवार! मंगळवेढ्यात आवताडेंच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’ची चर्चा; काका-पुतण्याच्या लागोपाठ स्वतंत्र बैठका; राजकीय वर्तुळात खळबळ

June 10, 2026
​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

June 11, 2026
शेतकऱ्यांनो! कृषी योजनांच्या लाभासाठी पात्र लाभार्थीनी अर्ज करावा; मंगळवेढ्याच्या कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, बियाण्यांची चिंता मिटली! मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ यांनी दिली ‘ही’ अत्यंत महत्त्वाची माहिती

June 10, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

​भीषण अपघात! मंगळवेढ्याजवळ क्रेटा कारचा चक्काचूर, ‘या’ कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; २ जण जागीच ठार, तीन गंभीर जखमी; असा घडला थरकाप उडवणारा अपघात

June 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

विद्यार्थ्यांनो..! १० वी, १२ वी नंतर पुढे काय? आमदार समाधान आवताडेंच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढ्यात रंगणार ‘गुणगौरव व करिअर मंत्र सोहळा

June 10, 2026
मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

June 8, 2026
Next Post
दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता! दहावी परीक्षेच्या पाठोपाठ आता 'ही' परीक्षा रद्द होण्याची शक्यता?

ताज्या बातम्या

पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

June 10, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मंगळवेढ्यात थरार! पोलिसांना गुंगारा देऊन सब जेलमधून पळाला; पण पोलिसांच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने कर्नाटक गाठून ठोकल्या बेड्या

June 11, 2026
बळ वाढले! आ.समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांचे मनोमिलन; कारखान्याच्या हितासाठी पाठिंबा केला जाहीर

दोन बैठका, एकच उमेदवार! मंगळवेढ्यात आवताडेंच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’ची चर्चा; काका-पुतण्याच्या लागोपाठ स्वतंत्र बैठका; राजकीय वर्तुळात खळबळ

June 10, 2026
​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

June 11, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! राज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार; मात्र विदर्भासाठी नवी तारीख, वाचा..

June 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..