mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, उपोषण मंडपातच सलाईनवर; कार्यकर्त्यांना टेन्शन; सरकारला जाग येणार का?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 6, 2023
in राज्य
दमदार योद्धा! अध्यादेश आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही, आजपासून ‘हे’ सुटलं म्हणून समजा; मनोज जरांगे यांचा सरकारला थेट इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी प्राणपणाला लावले आहेत. जरांगे पाटील गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज नवव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे.

मात्र, तरीही ते आपल्या निर्धारावर ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीत उपोषण सोडायचं नाही असा निर्धारच त्यांनी केला आहे. तर त्यांची प्रकृती खालावल्याने मराठा कार्यकर्त्यांना टेन्शन आलं आहे.

सरकारने जरांगे पाटील यांना वाचवावं. आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढावा, असं कळकळीचं आवाहन मराठा आंदोलकांनी केलं आहे.

मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. अंगात ताकद राहिली नाही. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आहे. त्यामुळे उपोषण स्थळीच जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आली आहे.

पहाटेच त्यांना सलाईन लावली आहे. त्यांच्याभोवती कार्यकर्ते जमले आहेत. तर जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची वार्ता पसरल्याने जालना, औरंगाबादसह आजपासच्या जिल्ह्यातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीकडे यायला निघाले आहेत. त्यामुळे आज अंतरवाली सराटी येथे आंदोलकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज सकाळी अचानक उपोषण स्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

तसेच त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. आंदोलकांनाही शांतता राखण्याचं आवाहन केलं. दरम्यान, अतिरिक्त पोलीस महासंचाल आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अचानक आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

राज्य सरकारचं शिष्टमंडळ चारवेळा जरांगे पाटील यांना भेटलं. पण त्यातून काहीच तोडगा निघाला नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जीआरमध्ये दुरुस्ती करून आणतो, असं आश्वासन अर्जुन खोतकर यांनी दिलं होतं. पण तो दुरुस्त केलेला जीआर घेऊन ते अद्यापही आलेले नाहीत.

जीआरमध्ये फक्त कॉमा टाकायचा आहे, असं खोतकर म्हणाले. तो कॉमा आज तिसऱ्या दिवशीही न निघाल्याने मराठा आंदोलक संतापले आहेत. अर्जुन खोतकर आणि गिरीश महाजन यांनीही जरांगे पाटील यांची भेट घेतली. पण त्यातून काहीच तोडगा निघालेला नाही.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मनोज जरांगे

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

भेसळखोरांचे धाबे दणाणले! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोखठोक आदेश, ‘हयगय करू नका, थेट मकोका लावा’

August 13, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आंबोलीच्या धबधब्याखाली आनंद लुटत होते, अचानक गडागडा लोळायला लागले; तोंडातून फेस, पर्यटकाचा मृत्यू

August 13, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

मोठी बातमी! महाराष्ट्रात दूध, दही आणि पनीर होणार महाग; ‘या’ दिवशी पासून नवीन भाव लागू

August 9, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

शाळांच्या ‘इतक्या’ मीटर परिसरात जंक फूड दिसल्यास परवाना थेट रद्द; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

August 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यातील अकरा ग्रामपंचायतींना सुंदर गाव पुरस्कार; मंगळवेढ्यातील ‘या’ गावाचा समावेश

मिस्टर सरपंचानो! महिला सरपंचांच्या पतीच्या लुडबुडीला लागणार लगाम; शासनाचा ग्रामपंचायतींसाठी 'हा' आहे नवा आदेश

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात ‘विश्वकर्मा महिला नागरी सहकारी पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; आकर्षक ठेवी व कर्ज योजनांचा शुभारंभ

मंगळवेढ्यात ‘विश्वकर्मा महिला नागरी सहकारी पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; आकर्षक ठेवी व कर्ज योजनांचा शुभारंभ

August 14, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

गुंतवणूक भविष्याची, बचत आजची! ​स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्राहकांसाठी ‘फ्री खरेदीखत’ ऑफर जाहीर; ‘दामाजी सिटी’ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद; आजच 9890605962 बुकिंगसाठी कॉल करा

August 14, 2026
प्रामाणिकपणाचा आदर्श! ​रात्री दामाजी चौकात पडला महागडा मोबाईल… पुढे अक्षयने जे केले त्याने जिंकली मंगळवेढेकरांची मने

प्रामाणिकपणाचा आदर्श! ​रात्री दामाजी चौकात पडला महागडा मोबाईल… पुढे अक्षयने जे केले त्याने जिंकली मंगळवेढेकरांची मने

August 13, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जुन्या वादातून तुफान हाणामारी; दोन्ही गटांचे एकमेकांवर गंभीर आरोप, मंगळवेढा पोलीस ठाण्यात १६ जणांवर गुन्हे दाखल

August 13, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मंगळवेढ्यात थरार! काळ्या स्कॉर्पिओतून आले अन् चाकू-रॉडने हल्ला केला; कार बंद पडल्याचा फायदा घेत कुटुंबाला धाक दाखवून १ लाख ४ हजारांचा मुद्देमाल लांबवला

August 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा