mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 14, 2023
in राज्य
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर 17 दिवसानंतर उपोषण सोडलं आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यात येऊन जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली.

त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांशी संवाद साधला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्हीही मनोज सारखे स्वस्थ बसणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळीच जालन्याच्या दिशेने रवाना झाले. पावणे अकराच्या सुमारास ते अंतरवाली सराटी गावात आले. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी 15 मिनिटे चर्चा केली. आरक्षणाबाबत सरकारने काय काय उपाय योजना केली.

सरकारची भूमिका काय आहे? आणि कशापद्धतीने हा प्रश्न सोडवला जाणार आहे, याबाबतची चर्चा त्यांनी जरांगे पाटील यांच्याशी केली. त्यानंतर आपल्या हाताने जरांगे पाटील यांना ज्यूस देऊन त्यांचं उपोषण सोडलं.

तर जनता मागे उभे राहते

मी बाबाला सांगितलं मघाशी तुझं पोरगं भारी आहे. स्वत:साठी नाही समाजासाठी लढतोय. मनोजला मी गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो. त्याने वैयक्तीक फायद्यासाठी कोणताही प्रश्न मांडला नाही. जेव्हा भेटला तेव्हा मराठा समाजाबद्दलच आग्रही भूमिका मांडली.

मी मनोजला मनापासून शुभेच्छा देतो. त्याचं मनापासून अभिनंदनही करतो. कारण एखादं आंदोलन करणं आणि आमरण उपोषण करणं आणि जिद्दीने पुढे नेणं, त्याला या महाराष्ट्रात जनतेचा प्रतिसाद मिळणं या सर्व गोष्टी कमीवेळा पाहायला मिळतो. पण त्याचा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असतो त्याच्यामागे जनता उभी राहते, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

पहिल्या दिवसापासून लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला. सर्वात आधी तुम्हाला यासाठी धन्यवाद देतो की मी तुम्हाला भेटायला आलो. तुम्हाला उपोषण सोडायची विनंती केली. तुम्ही माझ्या हस्ते सरबत घेतली. त्याबद्दल आभारी आहे.

3700 मुलांना नोकऱ्या दिल्या

सरकारची भूमिका स्पष्ट आहे. यापूर्वीही सरकारने मराठा समाजाला 16 आणि 17 टक्के आरक्षण दिलं होतं. अध्यादेश काढला होता. कोर्टाने स्थगित केला. आपण कायदा केला. सरकारने 12 ते 13 टक्के कन्फर्म केला. पण दुर्देवाने सर्वोच्च न्यायालयात हा कायदा टिकला नाही. तो का टिकला नाही, हे मनोजलाही माहीत आहे. त्यावर मी बोलणार नाही. पण आरक्षण देण्याची भूमिका आहे.

आरक्षण रद्द झालं. तेव्हा 3700 मुलांच्या मुलाखती झाल्या होत्या. नोकऱ्या मिळत नव्हत्या. त्यांना नोकऱ्या देण्याचं धाडस कोणी करत नव्हतं. पण मी त्यांना नोकऱ्या दिल्या. जे काही होईल त्याला सामोरे जावू असं ठरवलं. ते मुलं आजही नोकरीत आहेत. इतरही सुविधा दिल्या, असं मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मनोज जरांगे

संबंधित बातम्या

मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 8, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
Next Post
Breaking! पाठीमागून येणाऱ्या कारने पिकअप गाडीला उडवले, मंगळवेढ्यातील एकाचा मृत्यू; दोघेजण गंभीर जखमी

मोठी बातमी! उपचारासाठी मुंबईला घेऊन जाताना रुग्णवाहिकेचा पुण्यात अपघात; मंगळवेढ्यातील रुग्णाचा मृत्यू, तर आई-वडील गंभीर जखमी

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा