टीम मंगळवेढा टाईम्स ।
महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतांनाच चारित्र्याच्या संशयावर पतीने पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी मंगळवेढा तालुक्यातील हिवरगाव येथे घडली आहे.
या हत्येप्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
रूपाली हणमंत माने (वय.28) असे निर्घृण हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर हणमंत मच्छिंद्र माने (वय 40) असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या पतीचे नाव आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज दि.31 डिसेंबर रोजी सकाळी 08:00 वा.च्या पुर्वी फिर्यादीची बहिण रूपाली हणमंत माने वय 28 वर्षे रा.हिवरगाव ता.मंगळवेढा हिचे नंदेश्वर येथील कोणत्या तरी अज्ञात इसमाबरोबर अनैतीक संबंध असल्याच्या संशयावरून फिर्यादीचे मेव्हणे हणमंत मच्छिंद्र माने यांनी तीस शिवीगाळी , दमदाटी करून कोणत्यातरी धारदार हत्याराने तिचे डोकीत वार करून तिचा खुन केला आहे.
याप्रकरणी मयत रुपालीचा भाऊ बंडोपंत जालींदर कोडग यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भा.द.वि.कलम 302,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे हे करीत आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज