टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात तीन ठिकाणी तर लक्ष्मी दहिवडी येथे एका ठिकाणी अशा चार ठिकाणी एकाच रात्री चोरटयांनी घरफोडया करून जवळपास ३ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या चोरीच्या घटनेमुळे चोरटयांची दहशत निर्माण झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
घटनेची हकिकत अशी,तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील फिर्यादी शेतकरी संतोषकुमार जुंदळे यांच्या घराचे लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरटयांनी घरामध्ये प्रवेश करून कपाटाजवळ ठेवलेल्या चावीने कपाट उघडून कपाटातील सोन्याचे दागिने , रोख रक्कम , मोबाईल असा २ लाख ९ ८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला आहे.
ही घटना दि.२५ च्या पहाटे घडली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे .घटनास्थळाला पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी भेट देवून पहाणी केली.
दुसऱ्या चोरीच्या घटनेत मंगळवेढा शहरातील माने गल्ली येथे राहणारे फिर्यादी कविता सुभाष सुरवसे या महिलेच्या घरामध्ये दि.२५ रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरटयाने बंद घराचा दरवाजा मोडून घरात प्रवेश करून कपाटाचे लॉक तोडून ड्रॉवरमध्ये ठेवलेले ६२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याने दागिने चोरून नेले आहेत.
तसेच माझ्या प्रमाणे सतीश माने (रा.कैकाडी गल्ली) व वाहित मुलाणी (रा.मुलाणी गल्ली) या दोघांच्या घरी प्रवेश करून चोरी केली आहे. एकाच रात्री चार घरफोडया करून चोरटयांनी पोलिसांनाच तपासाचे आव्हान केले आहे.
एकाच रात्री अचानक चार चोऱ्या झाल्याने शहर व ग्रामीण भागातील नागरिक भयभीत झाले असून पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
लक्ष्मी दहिवडी येथील चोरी प्रकरणी सोलापूर येथून श्वान पथक मागविण्यात आले होते. मात्र हे श्वान बंगल्याच्या तिथेच घुटमळले.या चोरीचा तपास स्वतः पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे हे करीत आहेत.
Mangalwedha Four burglars in one night; 3 lakh 61 thousand items were stolen by thieves
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज