टीम मंगळवेढा टाईम्स ।
राहत्या घराच्या अर्धवट उघड्या दरवाजातून प्रवेश करून कपाटात ठेवलेले 1 लाख 34 हजार रुपयांच्या सोन्याचा ऐवज चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सदर ती घटना तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील पाटील वस्तीवर काल रात्री 10.30 ते मध्यरात्री 1.30 च्या दरम्यान घडली.
याबाबत सिताराम लक्ष्मण गायकवाड वय 60 रा. लक्ष्मी दहिवडी यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण गायकवाड यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून
40 हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची अंगठी, 16 हजार रुपये किमतीची लेडीज अंगठी,30 हजार रुपये किमतीची सोन्याची ठुशी, 10 हजार रुपये किमतीची कर्णफुले व 8 हजार रुपये रोख असा ऐवज घेऊन चोरट्याने पोबारा केला.

शहर व ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे चोरटे पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
पोलिस अधीक्षकांनी घोषणा केल्याप्रमाणे ग्रामीण भागात सीसीटीव्ही व प्रमुख ठिकाणे घंटा बसवण्याच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













