टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी येथील आरोपी प्रविण अशोक पाटील यांची अल्पवयीन मुलीवर बलात्कार व बाल लैंगीक अत्याचार कायदयाच्या कलमातून पंढरपूर येथील जिल्हा न्यायाधिश तोष्णीवाल यांनी आरोपीची सशर्त जामीनावर मुक्तता करणे बाबतचे आदेश करण्यात आले.
मौजे निंबोणी , ता . मंगळवेढा येथील फिर्यादी दानाक्का बसवंत पाटील हिने आरोपी प्रविण अशोक पाटील , रा . निंबोणी , ता . मंगळवेढा , जि . सोलापूर यांचेविरुध्द
भारतीय दंड विधान संहिता कलम ३७६ , ३७६ ( २ ) ( एन ) व बाललैंगीक अत्याचार प्रतिबंध अधिनियम चे कलम ४,६ , ९ , १२ प्रमाणे फिर्यादीचे मुलीवर बलात्कार करुन तिच्यावर अत्याचार केला अशी फिर्याद दाखल केलेली होती .
सदर फिर्याद दाखल झालेनंतर यातील आरोपीस मंगळवेढा पोलीस स्टेशन यांनी दिनांक २४/०६/२०२२ रोजी अटक केली . त्यानंतर दिनांक २७/०६/२०२२ पासून सदर आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये होता.
आरोपीतर्फे मे . पंढरपूर येथील जिल्हा न्यायालयात आरोपीस जामीन मिळणेकरिता अर्ज ठेवण्यात आला होता.
आरोपीचे वकील , सरकार पक्षाचे म्हणणे , पोलीस तपास अधिकारी व सरकारी वकील यांचा युक्तीवाद ऐकून व आरोपीतर्फे अॅड . प्रकाश घुले यांनी केलेला युक्तीवाद मान्य करुन मे . जिल्हा न्यायाधिश पंढरपूर यांनी आरोपीची जामीनावर मुक्तता करणेबाबत आदेश करण्यात आले.
सदर जामीन अर्जाचे कामकाज आरोपीतर्फे अॅड . प्रकाश घुले व अॅड. बापूसाहेब यादव यांनी पाहिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज