mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भय संपलं नाही! राज्यातील ‘हे’ जिल्हे रेड झोनमध्येच; 31 मेनंतरही लॉकडाऊनची टांगती तलवार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 25, 2021
in राज्य
महाराष्ट्रात कडक निर्बंधांबाबत ‘या’ तारखेनंतर घोषणा होण्याची शक्यता?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्रातील सोलापूर,कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह 15 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यू दर या निकषांवर या जिल्ह्यांना रेड झोनमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे.

या जिल्ह्यांत एक जूननंतरही कडक लॉकडाऊन राहणार आहे. त्याचवेळी उर्वरित जिल्ह्यात लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल केला जाणार असल्याचे संकेत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी दिले.

राज्यव्यापी लॉकडाऊनची मुदत 1 जून रोजी सकाळी संपत असल्याने त्याबाबत येत्या पाच-सहा दिवसांत जिल्ह्यांचा आढावा घेऊन लॉकडाऊनबाबत निर्णय घेतले जातील.

ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्येत घट झाली आहे, त्या जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून सवलत देण्याचा विचार आहे, असेही ते म्हणाले. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनची मुदत 1 जूनला सकाळी 7 वाजता संपत आहे.

गेला दीड महिना लॉकडाऊन असून आता लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे ज्या भागात रुग्णसंख्या घटली आहे, त्या ठिकाणी ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत व्यवहार सुरू करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत.

1 जूनपासून काही जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. काही जिल्हे अजूनही रेड झोनमध्ये असल्याने अशा जिल्ह्यांमध्ये शिथिलता आणता येणार नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. मात्र ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे, तेथे लॉकडाऊन शिथिल करण्यावर विचार सुरू असल्याचे ते म्हणाले.

रेड झोनमधील जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा एका आठवड्यात आढावा घेऊन जिल्हानिहाय त्याबाबत निर्णय घेतले जातील. रेड झोनमधील जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झाली नाही तर कडक लॉकडाऊन कायम ठेवण्याशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले.

रुग्णसंख्या वाढत असणार्‍या जिल्ह्यात कोरोनाबाधितांना घरी क्वारंटाईन करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. तेथे कोव्हिड सेंटर किंवा संस्थेमध्येच क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत असली तरी लोकल पुढील 15 दिवस सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही, असे ते म्हणाले.

कोरोनाचे संकट असताना त्यात ब्लॅक फंगसचा आजार विळखा घालत आहे. त्यापाठोपाठ व्हाईट फंगसचा संसर्ग सुरू झाला. आता यलो फंगसचे नवे संकट येऊ पाहत आहे.

उत्तर प्रदेशात यलो फंगसचा पहिला रुग्ण सापडला आहे. ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षा यलो फंगस अधिक धोकादायक असल्याने तज्ज्ञांनी सावध राहण्यास सांगितले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: लॉकडाउन

संबंधित बातम्या

विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

जमिनीच्या तुकड्यासाठी कोर्टाची पायरी चढणाऱ्यांनी एकदा वाचाच; वडिलांच्या निधनानंतर मुलांनी घराच्या अंगणातच केलं असं काही पंचक्रोशीतून होतंय प्रचंड कौतुक

June 1, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगेंनी लढाई जिंकली, उपोषण सोडलं; सरकारकडून मागण्या मान्य; अंतरवालीत मध्यरात्री काय घडलं?

May 31, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक फायनल? अधिकृत घोषणा बाकी; मात्र भाजपच्या ‘त्या’ नेत्याच्या एन्ट्रीने सस्पेन्स वाढला

May 30, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

तब्बल पावणे सतरा लाखांचा गैरव्यवहार; ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे थेट निलंबन, विभागीय आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय

May 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मेहनत विद्यार्थ्यांची, मलिदा चोरांचा! NEET पेपरफुटीच्या टेन्शनमुळे १९ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या; डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले

May 30, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

May 29, 2026
Next Post
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

सोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांचा आकडा कमी होताना दिसत नाही; जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला दिले 'हे' आदेश

ताज्या बातम्या

बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 1, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

May 31, 2026

तरुणांनो सावधान! बॉडी फुगवण्यासाठी वापरले जाणारे घातक इंजेक्शन विकणारे रॅकेट जेरबंद; २ लाखांचा मुद्देमाल जप्त; सोलापूर जिल्ह्यात अवैध नशिल्या इंजेक्शनचा काळा बाजार उघड

June 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा