टीम मंगळवेढा टाईम्स । विशेष प्रतिनिधी | सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचे महसूलविषयक प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी आणि विविध शासकीय दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध करून‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये २९ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत ही भव्य शिबांरे पार पडणार आहेत.

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या नियोजनाखाली या शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हा समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

आषाढी एकादशीच्या महासोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेची व्यस्तता लक्षात घेऊन ३ दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात हे शिबिर टप्प्याटप्प्याने घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तुमच्या मतदारसंघात शिबिर कधी आणि कुठे? (पूर्ण वेळापत्रक):
२९ जुलै: शहर मध्य: रंगभवन सभागृह, सोलापूर
३१ जुलै: करमाळा: कंदर
माढा: टेंभुर्णी
बार्शी: संत तुकाराम सभागृह
मोहोळ: घाटुळे मंगल कार्यालय
अक्कलकोट: तहसील कार्यालय
दक्षिण सोलापूर: कासेगाव
सांगोला: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन

१ ऑगस्ट:
शहर उत्तर: रंगभवन, सोलापूर
दक्षिण सोलापूर: महात्मा गांधी भवन, मंद्रूप
२ ऑगस्ट:
पंढरपूर: यश पॅलेस
माळशिरस: अक्षता मंगल कार्यालय

एकाच छताखाली मिळणार ‘या‘ सर्व सेवा:
नागरिकांना शासकीय कार्यालयांचे खेटे मारावे लागू नयेत म्हणून या शिबिरात थेट अर्ज स्वीकारून कामांचा निपटारा केला जाणार आहे:
महसूल सेवा: ७/१२ उतारे, ८-अ, फेरफार नोंदी दुरुस्ती, जमिनीचे मोजणी अर्ज, वाटपपत्रे आणि फेरफार तडजोड.
शासकीय दाखले: उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, वय व अधिवास (डोमोसाइल) दाखला.

नागरिकांना आवाहन:
“आपल्या महसूलविषयक कामांसाठी व विविध दाखल्यांसाठी नागरिकांनी संबंधित तारखेला उपस्थित राहून या महाराजस्व समाधान शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,” असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













