mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विचारांचा वारसदार! स्‍व.आ.भारत भालके म्हणाले होते, मंगळवेढ्याच्या पाणीप्रश्‍नासाठी शैला गोडसे यांनी केले प्रयत्न.

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 14, 2021
in मंगळवेढा, राजकारण
विचारांचा वारसदार! स्‍व.आ.भारत भालके म्हणाले होते, मंगळवेढ्याच्या पाणीप्रश्‍नासाठी शैला गोडसे यांनी केले प्रयत्न.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, मतदारसंघात चर्चेला उधाण

स्‍व.आ.भारत भालके हे मंगळवेढा तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी शैलाताई गोडसे यांनी प्रयत्न केले असल्याची कबुली दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधत आहे. आणि यामुळे मतदारसंघात सध्या चर्चांना उधाण आले आहे.

गत विधानसभा निवडणुकीत मंगळवेढा येथील जाहीर सभेत स्व.भालके यांनी शैला गोडसे यांनी मंगळवेढा तालुक्यातील पाणीप्रश्‍नासाठी प्रयत्न केले असल्याची कबुली दिली होती.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यानिमित्ताने इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराचा अक्षरशः धुरळा उडाला आहे.

यामध्ये सोशल मीडियावर सध्या जुन्या व्हिडीओ क्लिप्स येण्याचे प्रमाण वाढले आहे. यातच गेल्या दोन दिवसांपासून ही जुनी व्हिडिओ क्लिप लक्षवेधक ठरत आहे.

स्‍व.आ.भारत भालके म्हणाले, शैला गोडसे यांनी केले मंगळवेढ्याच्या पाणीप्रश्‍नासाठी प्रयत्न pic.twitter.com/MzJz6x7Zgz

— Mangalwedha Times (@SamadhanFugare) April 14, 2021

मुळात प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून शैलाताई गोडसे या अपक्ष निवडणूक लढवत असूनसुद्धा आजपर्यंत सर्वात लक्षवेधक ठरल्या आहेत. कोणताही मोठा राजकीय पक्ष नाही किंवा एकही स्टार प्रचारक नसतानासुद्धा शैलाताई गोडसे यांची प्रचार यंत्रणा सध्या मतदारसंघात सर्वात लक्षवेधक ठरली आहे.

या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारापेक्षा झुंजार आणि संघर्षशील उमेदवार अशी चर्चा शैलाताई गोडसे यांच्या बाबतीत वारंवार मतदारसंघात होताना दिसत आहे. आणि आता या व्हिडीओ क्लिपमुळे स्वतः स्व. भालके यांनी पाणी प्रश्नाबद्दल शैला गोडसे यांनी प्रयत्न केले असल्याची कबुली दिली असल्यामुळे शैलाताई गोडसे यांच्याबद्दल मतदारांमध्ये पहिल्यापेक्षा जास्त आकर्षण निर्माण झाले आहे अशीही चर्चा होताना दिसत आहे.

एकुणात या व्हिडीओ क्लिपमुळे शैला गोडसे यांच्या मताधिक्यात वाढ झाली तर आश्चर्य वाटायला नको अशीच परिस्थिती सध्या मतदारसंघात दिसत आहे.

शैला गोडसे या एक आंदोलनकरी महिला म्हणून प्रसिद्ध

शैला गोडसे या एक आंदोलनकरी महिला म्हणून सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. मंगळवेढा तालुक्याचा पाण्याचा प्रश्नासाठी असो अथवा पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील इतर कामांसाठी शैला गोडसे यांनी आंदोलन तसेच शासन दरबारी वारंवार पाठपुरावा केला आहे.

यामध्ये स्व.भारत भालके यांनी मंजूर केलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजना असो अथवा म्हैसाळचे पाणी मंगळवेढा तालुक्याला मिळण्यासाठी शैला गोडसे यांनी आंदोलने केली आहेत. मुळात स्व.भालके यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात एक संघर्षशील लोकप्रतिनिधी अशी आपली प्रतिमा तयार केली होती.

यावरच त्यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघात विजय मिळविला. स्व. भालके यांच्यानंतर या मतदारसंघात संघर्षशील नेतृत्व म्हणून शैला गोडसे यांचेकडे पाहिले जात असल्याची चर्चा मतदारसंघात याआधी वारंवार झाली आहे. सध्याच्या या व्हिडीओ क्लिपमुळे शैला गोडसे यांच्या बाबतीत पुन्हा ती चर्चा होताना मतदारसंघात दिसत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शैला गोडसेस्व.भारत भालके

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
Next Post
विठ्ठल कारखाना हडप करण्यासाठी अख्ख पवार कुटुंबिय आज प्रचार करत फिरतंय; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची राष्ट्रवादीवर सडकून टीका

विठ्ठल कारखाना हडप करण्यासाठी अख्ख पवार कुटुंबिय आज प्रचार करत फिरतंय; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची राष्ट्रवादीवर सडकून टीका

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 10, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा