टीम मंगळवेढा टाईम्स :
मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी गावचे युवा नेते सिद्धनाथ (भाऊ) सलगर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक भान जपत परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत खालील शाळांमधील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात येणार आहे:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खुपसंगी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पटेल वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चौगुले वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लवटे वस्ती, श्री कामसिद्ध विद्यालय, खुपसंगी, मूक-बधिर विद्यालय, मंगळवेढा

वाढदिवसाचा फालतू खर्च टाळून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी या सामाजिक उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

मिनी ऑर्केस्ट्रा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
वाढदिवसानिमित्त बुधवार, दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ०७:०० वाजता ‘सिद्धनाथ (भाऊ) सलगर फार्म हाऊस, खुपसंगी’ येथे मिनी ऑर्केस्ट्रा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

प्रमुख उपस्थिती: मा. तानाजी (भाऊ) खरात (व्हॉ. चेअरमन, दामाजी शुगर), पै. भैयासाहेब बंडगर (उपाध्यक्ष, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य), मा. महावीर (आप्पा) ठेंगील (सरपंच, मुढवी), मा. सोमनाथ बुरजे, मा. संजय माने, मा. समाधान बंडगर (SIR-G).

आधारस्तंभ व आयोजक: विजय रेवे, आनंद पडवळे, दादासाहेब लवटे, अक्षय देवकते, दत्ता लवटे, बाळू क्षीरसागर, सोनू मेटकरी व समस्त मित्र परिवार.

या सर्व कार्यक्रमांचा लाभ परिसरातील नागरिक, ग्रामस्थ व मित्र परिवाराने घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












