टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील चर्चेसंबंधी माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाची चिंता सरकारलाही आहे आणि सर्वपक्षीय बैठकीत इतर नेत्यांनी ती व्यक्त केली. राज्यात कायदा-सुव्यवस्था अबाधिता राहावी, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, ज्या-ज्या वेळी राज्यावर संकट आलं तेव्हा सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका यापूर्वीही झालेल्या आहेत. शेवटी संवाद आणि सुसंवादातून मार्ग निघत असतो.
सर्वपक्षीयांनी ठराव पारीत केला असून मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेतलं पाहिजे, असं नमूद करण्यात आलेलं आहे. जस्टीस शिंदे साहेबांच्या कमिटीला वेळ द्यावा, कमिटीमध्ये जरांगे पाटलांचे काही सदस्य येऊ इच्छित असली तर तोही निर्णय घेतलेला आहे.
जे गुन्हे आंदोलकांवर दाखल झालेले आहेत. ते गुन्हा मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तशा सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. लाठीचार्जमध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी होती.
एक उपविभागीय अधिकाऱ्याला निलंबित केलं होतं. आंदोलकांची मागणी तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची होती. त्यानुसार तीन अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे,
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, छत्रपती संभाजीराजे भोसले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब, राजेश टोपे, चंद्रशेखर बावनकुळे, राजू पाटील, विनोद निकोले, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, सुनील तटकरे, गौतम सोनवणे उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज