mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बंधनकारक! सर्व्हेची अनेकांना माहितीच नाही; प्रत्येक घराला मार्किंग गरजेचे; सर्वेक्षणावेळी मराठा समाजा शिवाय इतर कुटुंबांनाही भेटी द्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 29, 2024
in राज्य, सोलापूर
सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक; उद्या मंगळवेढा बंदची हाक

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे म्हणून राज्यातील मराठा कुटुंबाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीचा सर्व्हे होत आहे. सर्वेक्षणावेळी ‘मराठा’शिवाय इतर कुटुंबांचाही सर्व्हे बंधनकारक आहे.

मात्र, आरक्षण असलेल्या कुटुंबासंबंधीच्या चार प्रश्नांची उत्तरे ॲपवर टाकल्यावर तो अर्ज पूर्ण होतो. त्यामुळे अनेकजण इतरांच्या घरी न जाताच माहिती अपलोड करीत असल्याची ओरड होत आहे. वास्तविक सर्व्हे करणाऱ्यांनी प्रत्येक घरी जाऊन माहिती घेतल्यानंतर संबंधित घरांवर सर्वेक्षण झाल्याची खूण करणे बंधनकारक आहे.

राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले, पण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले. त्यासंदर्भातील सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून आता ज्या कारणांमुळे आरक्षण नाकारले, त्याच्या पूर्ततेसाठी सरकारच्या माध्यमातून हे सर्वेक्षण सुरू आहे.

आरक्षणाअभावी हाल होणाऱ्या मराठा कुटुंबांची संख्या लक्षणीय असल्याची वस्तुस्थिती असून त्यांना आरक्षण मिळायलाच हवे. पण, कमीत कमी दिवसात सर्व्हे पूर्ण व्हावा म्हणून अनेक कर्मचारी वेगवेगळी शक्कल लढवत आहेत.

दरम्यान, प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल कोकणात जाणार असल्याने त्यांना मुदतीत सर्व्हे पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे एका शिक्षकाचे काम अपूर्ण राहिल्याने बाकीचे शिक्षक त्यांना मदत करीत आहेत. त्यावेळी मराठा कुटुंबांना भेटी देऊन माहिती भरा, बाकीच्यांची माहिती कार्यालयात बसूनही भरता येईल, असा सल्ला त्या शिक्षकास दिल्याचा प्रकार मोहोळ तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी बोलताना सांगितले.

मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या सर्व्हेची जबाबदारी कृषी सहायक, तलाठी ग्रामसेवक व शिक्षकांवर आहे. त्यासाठी गावचे पोलिस पाटील, कोतवाल यांचीही मदत घेतली आहे. पण, अनेकांना आपल्या कुटुंबांचा सर्व्हे झाल्याची माहितीच नाही ही वस्तुस्थिती आहे. याबद्दल संबंधितांना विचारले असता, त्या कुटुंबाचा अजून सर्व्हे झाला नसल्याचे सांगितले जाते. ३१ जानेवारीपर्यंत सर्व्हेची मुदत आहे.

सध्याच्या सर्वेक्षणातून समोर येणारी माहिती एकत्रित करून सर्वोच्च न्यायालयात सादर केली जाईल. पण, अनेकांकडे दुचाकी, चारचाकी वाहने व ॲन्ड्राईड मोबाईल आहेत, पक्के घर आहे. तरीदेखील त्या उलट माहिती दिली जात असल्याचे काही सर्व्हे करणाऱ्या लोकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. पण, हा सर्व्हे म्हणजे चौकशी, पडताळणी नव्हे तर समोरील व्यक्ती जो माहिती सांगेल ती ॲपवर अपलोड केली जात असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

घरावर खूण करणे बंधनकारक

मराठा समाजाबरोबरच इतर सर्वच समाजातील घरी भेटी देऊन त्यांचीही माहिती ॲपवर भरण्याचे स्पष्ट आदेश आहेत. प्रत्येक घराला भेट दिल्याची खात्री पर्यवेक्षकांकडून केली जात आहे. तसेच त्या घरांना भेटी दिल्यानंतर मागासवर्गीय आयोगाच्या लोगोची खूण देखील तेथे करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय सर्व्हे पूर्ण झाला असे गृहीत धरले जात नाही.- निखिल मोरे, अतिरिक्त आयुक्त, सोलापूर महापालिका(स्रोत:सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मराठा समाज सर्वेक्षण

संबंधित बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 19, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 19, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 15, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
Next Post
महाराष्ट्र केसरी! सिकंदर शेख पराभूत, मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड फायनलमध्ये

बहुमान! पैलवान एकनाथ बेदरे मंगळवेढा केसरीचा मानकरी; सांगलीच्या संस्कृती मुळेला महिला केसरीचा मान; रकमेसह चांदीची गदा बक्षीस

ताज्या बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 19, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 19, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा