mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठा निर्णय! राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून पदवी शिक्षण ‘इतक्या’ वर्षांचं होणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 10, 2022
in राज्य, शैक्षणिक
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

टीम मंगळवेढा टाईम्स ।

भारत कोठेही जावा पदवी मिळवण्यासाठी तीन वर्षांचा शिक्षणक्रम असतो. त्यानंतर विद्यार्थी पदवीधर होतो. 2020मधल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे (एनईपी) या शैक्षणिक रचनेत हळूहळू बदल होताना दिसत आहेत.

महाराष्ट्रातदेखील पदवीच्या शिक्षणात लवकरच बदल होणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रातल्या सर्व पदवी (UG) अभ्यासक्रमांचा कार्यकाळ चार वर्षांचा होणार आहे.

राज्यातलं पुढचं शैक्षणिक वर्ष जून 2023मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. मंगळवारी (6 डिसेंबर) उशिरा प्रसिद्ध करण्यात आलेल्या ठरावात (जीआर) राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं यासंबंधी सर्व विद्यापीठांना नियमावली तयार करण्यास सांगितलं आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

एनईपीच्या अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाचे (एमयू) माजी प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालच्या राज्यस्तरीय समितीने आराखडा तयार केला आहे. या समितीने केलेल्या शिफारशीही राज्य शासनानं आपल्या जीआरमध्ये घेतल्या आहेत.

या शिफारशींनुसार, विद्यार्थ्याला पदवी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक वर्षानंतर या चार वर्षांच्या अभ्यासक्रमातून बाहेर पडण्याचा किंवा सोडण्याचा पर्याय मिळेल. उदाहरणार्थ, पदवीचं पहिलं वर्ष पूर्ण केल्यानंतर बाहेर पडल्यास विद्यार्थ्याला फक्त प्रमाणपत्र मिळेल.

दोन वर्षांनी बाहेर पडल्यास डिप्लोमा प्रमाणपत्र, तीन वर्षांनी बाहेर पडल्यास बॅचलर डिग्री आणि चार वर्षं पूर्ण केल्यानंतर ऑनर्स किंवा संशोधनाची बॅचलर डिग्री मिळेल. अंतिम वर्ष वगळता आणि ब्रिज कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना ही सुविधा घेणं शक्य होईल. यामुळे विद्यार्थ्याला रोजगार कौशल्यांमध्ये प्रशिक्षण मिळवण्यास मदत होईल.

विद्यार्थ्यांना सेमिस्टर निवडण्याची परवानगी दिली पाहिजे, अशीदेखील शिफारस करण्यात आलेली आहे. विद्यार्थी एकूण सहा सेमिस्टरपैकी दोन सेमिस्टर निवडू शकतील. जर एखाद्यानं पहिल्या सेमिस्टरमध्ये कोर्समध्ये प्रवेश घेला तर त्याला दुसरं सेमिस्टर पूर्ण केल्यानंतरच कोर्समधून बाहेर पडण्याची परवानगी दिली जाईल.

तिसऱ्या सेमिस्टरमध्ये कोर्समध्ये प्रवेश करणाऱ्याला चौथं सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर कोर्स सोडण्याची परवानगी दिली जाईल. हाच नियम पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरसाठी लागू असेल.

अनेकांनी जाणकारांनी, विशेषतः शिक्षकांनी या शिफारशींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सुधारणांसाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी जबाबदार असलेल्या बहुतेकशा विद्यापीठांमध्ये शैक्षणिक परिषद आणि अभ्यास मंडळं अस्तित्वात नाहीत.

या बाबीकडे अनेक शिक्षकांनी लक्ष वेधलं आहे. अनेक राज्य विद्यापीठांमध्ये अशा संस्था स्थापन केल्या जात आहेत; मात्र मुंबई विद्यापीठ अजूनही निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची वाट पाहत आहे.

बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियनचे (बीयूसीटीयू) सरचिटणीस डॉ. मधू परांजपे म्हणाले, “सरकार अनुदानित महाविद्यालयांना फी आणि अनुदान देण्याच्या बाबतीत या नवीन सुधारणांतल्या आर्थिक पैलूंबाबत कोणतीही वचनबद्धता दाखवण्यात अपयशी ठरलं आहे.

शिक्षकांची रिक्त पदं भरण्यात सरकार अपयशी ठरल्यानं मनुष्यबळाची कमतरता अगोदरपासूनच आहे. त्यात भर म्हणून, विद्यार्थ्याला मधूनच अभ्यासक्रम सोडण्याची परवानगी देऊन, सरकार तरुणांना उच्च शिक्षण सोडण्यास प्रोत्साहित करत आहे.’

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पदवी शिक्षण चार वर्ष

संबंधित बातम्या

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा! राजकारण की समाजकारण? मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान; नेमका प्लॅन काय?

June 22, 2026
३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

June 21, 2026
मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

दहावीच्या निकालात मोठा उलटफेर! पुनर्मूल्यांकनानंतर मंगळवेढ्याची पाटील महाराष्ट्रात सर्वप्रथम; मंगळवेढा इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

June 20, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

मोठी बातमी! सरकारी जमिनी हडपणाऱ्यांना मोठा दणका… ‘या’ जमिनींवर आता थेट महाराष्ट्र शासनाचे नाव लागणार…;  ‘इतक्या’ महिन्यांचा अल्टीमेटम

June 20, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! राज्याला पावसाची हुलकावणी, हवमान विभागाचा हादरवणारा अंदाज; आता थेट ‘या’ तारखेनंतरच पाऊस

June 21, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

स्क्रीनवर लाखो फॉलोअर्स, पण खऱ्या आयुष्यात नरकयातना! रिल स्टार रोहिणी पाराध्येच्या मृत्यूचा खरा विलन अखेर समोर; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 20, 2026
रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

June 17, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

राज्य सरकारची मोठी घोषणा! महिला बचत गटांना मिळणार अडीच एकर जमीन आणि 1 लाखांचं अनुदान; काय आहे योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये?

June 18, 2026
शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

June 16, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीसाठी आजपासून अर्ज करता येणार; वयोमर्यादा, शुल्क, पात्र होण्यासाठी गुण सर्व माहिती घ्या जाणून…

ऐतिहासिक निर्णय! पोलीस भरतीत आता यांनाही संधी मिळणार; लवकरच लागू होणार नवे नियम

ताज्या बातम्या

मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा! राजकारण की समाजकारण? मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान; नेमका प्लॅन काय?

June 22, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

सावधान! मंगळवेढा बस स्टँडवर चोरटे सक्रिय; वृद्धेचे दागिने आणि रोकड लंपास, गुन्हा दाखल; प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

June 22, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

June 21, 2026
३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

June 21, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

शेतकऱ्यांच्या संयमाचा विजय! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात शेतीसाठी मिळणार आता आठ तास वीज; ‘टाळे ठोकू’ इशाऱ्याची प्रशासनाने घेतली धडक दखल

June 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा