mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खबरदार! शेतकऱ्याकडून पैशाची मागणी केली तर गाठ माझ्याशी आहे; योजना पोहोचविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय करणार नाही; आ.आवताडे यांनी दिली सज्जड दम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 12, 2024
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
खबरदार! शेतकऱ्याकडून पैशाची मागणी केली तर गाठ माझ्याशी आहे; योजना पोहोचविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय करणार नाही; आ.आवताडे यांनी दिली सज्जड दम

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क। 

दुसऱ्यांदा आमदार पदी विराजमान झाल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील प्रशासनाची पहिली आढावा बैठक घेत अधिकाऱ्यांनी गतिमान प्रशासन चालवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे,

शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनेचा लाभ द्या या कामात हलगर्जीपणा दिसून आला तर मी कुणाचीही गय करणार नाही.

जे ठेकेदार टेंडर घेऊन काम न करता बसले आहेत त्यांना तात्काळ काळ्या यादीत टाका अशी तंबी प्रशासनास देत यापुढे दर महिन्याला प्रत्येक विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेतला जाईल, कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

मंगळवेढा येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये प्रशासनातील सर्व खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती यावेळी आमदार आवताडे बोलत होते.

या बैठकीला माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, प्रांतअधिकारी बी आर माळी, तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी योगेश कदम, जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर, माजी सभापती तानाजी काकडे, माजी उपसभापती सुरेश ढोणे, रामेश्वर मासाळ, माऊली कोंडुभैरी, प्रकाश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

या आढावा बैठकीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी प्रत्येक विभागाच्या खाते प्रमुखांकडून त्या त्या विभागातील कामाचा आढावा घेतला योजनेच्या अंमलबजावणी मध्ये आपल्याला काही अडचणी येतात का?,इतर काही साधनसामुग्रीची कमतरता आहे का?

काम करण्यास तुमच्या काही अडचणी आहेत का? याची सविस्तर माहिती घेण्यात आली यावेळी पंचायत समिती बांधकाम खात्याकडे निविदा स्तर कामे किती? पूर्ण किती? अपूर्ण किती? सुरू न झालेली किती याची माहिती घेऊन ज्या ठेकेदाराने टेंडर घेऊन सहा महिने काम सुरू केले नाही.

त्या ठेकेदारांना आजच्या आज नोटिसा काढून ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा सूचना देण्यात आल्या, कृषी विभागाला विम्यामध्ये बोगसगिरी होत असून बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने येणाऱ्या काळात टंचाई जाणवण्याची शक्यता असून त्यांचा आराखडे तात्काळ तयार करून पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या त्याचबरोबर काही ठिकाणी जलजीवनच्या कामांमध्ये निकृष्ट कामे झाल्याच्या तक्रारी आहेत अशा कामांना मी स्वतः भेटी देणार असल्याचेही आमदार अवताडे यांनी सांगितले.

एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने लेक लाडकी आणि अंतर्गत 252 लाभार्थ्यांना लाभ
तर लाडकी बहीण अंतर्गत 54257 लाभार्थ्यांना लाभ दिल्याचे सांगितले. पशुसंवर्धन विभागाअंतर्गत जनावरांची जनगणना होत असून प्रत्येकाच्या घरी जाऊन अचूकपणे जनगणना करण्याच्या सूचना देण्यात आल्या,

शिक्षण व आरोग्य विभागाकडून अनेक पदे रिक्त असून ती पदे तात्काळ भरण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मागणी आमदार अवताडे यांच्याकडे केली तर मंगळवेढा तालुक्यामध्ये 108 नंबर वर अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी 2 अंबुलन्स उपलब्ध आहेत.

यातील भोसे येथील अंबुलन्स सुरू असून मंगळवेढा येथील ॲम्बुलन्सला डॉक्टर नसल्याने अपघात असताना मदत करण्यासाठी ही गाडी जात नाही त्या ठिकाणी तात्काळ डॉक्टरची भरती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

पंचायत समिती अंतर्गत विविध योजनांसाठी ग्रामपंचायतच्या ग्रामसभा ठरावाची आवश्यकता असते अनेक गावांमध्ये ग्रामसेवक हे ग्रामसभा घेत नसून काही ठराविक लोकांची नावे घालून बोगस ठराव देत आहेत याला आळा घाला अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल अशा सूचना गट विकास अधिकारी योगेश कदम यांना आमदार अवताडे यांनी दिल्या.

नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेत असताना अनेकांनी नगरपालिकेच्या कारभाराविषयी तक्रारी केल्या
गटारी तुंबल्या आहेत साथीचे रोग वाढत आहेत एका कुटुंबात अनेक घरकुले दिली आहेत.

मुख्याधिकारी कसलेही लक्ष घालत नाहीत अशी तक्रार एका नागरिकांने केली असता आमदार अवताडे यांनी तुम्हाला मंगळवेढ्याचे काम झेपत नसेल तर जागा मोकळी करा जबाबदार अधिकारी काम करण्यासाठी येईल असे म्हणत आठ दिवसात कामकाजात सुधारणा करा अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल अशी तंबी मुख्याधिकाऱ्यांना दिली.

भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे बिल हे कोटीच्या घरात गेले असून शिखर समितीला ही योजना चालवणे शक्य नसून
शिखर समिती रद्द करून ही योजना शासनाकडे हस्तांतर करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

याचबरोबर महावितरण विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून मी मंजूर करून आणलेले ट्रांसफार्मर हे ठेकेदार आम्ही मंजूर करून आणतो असे सांगून शेतकऱ्यांकडून पैसे लुबाडत आहेत यावर संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अन्यथा मला माझ्या पद्धतीने तुमच्यावर लक्ष द्यावे लागेल असा इसारा महावितरण विभागाला देत जर कोणत्या शेतकऱ्याकडून पैशाची मागणी केली तर गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम महावितरण अधिकाऱ्यांना दिला.

याचबरोबर म्हैसाळ योजना भूमी अभिलेख सहाय्यक निबंधक आगार व्यवस्थापन क्रीडा अधिकारी राज्य उत्पादन शुल्क अन्न औषध प्रशासन भूजल सर्वेक्षण वनविभाग महसूल विभाग आदी विभागांचा आढावा घेत कामात गतिमानता आणा मी अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा प्रत्येक विभागाची स्वतंत्र आढावा बैठक लावून दर महिन्याला कामात किती सुधारणा झाली हे पाहणार आहे व कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार नाही असा इशारा आ आवताडे यांनी बैठकीप्रसंगी दिला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

​ग्रामस्थांनो, हेलपाटे मारायचे बंद! आता थेट सोलापूर जिल्हा परिषदेच्या CEO च्या व्हॉट्स ॲपवर पाठवा अर्ज; तक्रार निवारणासाठी हेल्पलाइन नंबर केला जारी

May 26, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राष्ट्रीय कर्तव्य बजावताना आदर्श शिक्षकाचा उन्हाच्या तडाख्याने दुर्दैवी मृत्यू; शिक्षण क्षेत्र हादरले

May 26, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

सोलापूर विधानपरिषद निवडणूक: उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम; कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली; मुंबईत लॉबिंग सुरू; परीचारकांचे नाव आघाडीवर पण…

May 26, 2026
Next Post
विद्यार्थ्यांनो! मंगळवेढ्यात उद्यापासून “टॅली प्राईम जीएसटी”चे मोफत डेमो लेक्चर; सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा उपक्रम

तुमच्या करियरला उंच भरारी देण्यासाठी सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, मंगळवेढा विद्यार्थ्यांसाठी विशेष कोर्सेस सादर करत आहे. अकाऊंटिंग क्षेत्रात करियर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Tally Prime कोर्स फक्त ₹2800/- या नाममात्र शुल्कात उपलब्ध आहे.

ताज्या बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..