मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
नांदायला घेऊन जाण्यासाठी सासू-सासरे व पती पाहुण्याच्या गावी आले होते. पत्नीच्या भावाने दारातच सास-याला मारहाण सुरू केल्यामुळे रागाच्या भरात पतीने धारदार चाकूने पत्नीच्या पाटीत, पोटात व कमरेत चाकू खुपसून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना घडली आहे.
आरती अमोल पाटील (वय ३२, रा. मेटकरी गल्ली, मंगळवेढा) असे मयत पत्नीचे नाव आहे. या हाणामारीत मयताचा सासरा अंबादास पाटील (ढेकळेवाडी), भाऊ प्रसाद रामचंद्र चौगुले व आई सोनाली रामचंद्र चौगुले (रा.मेटकरी गल्ली) हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल दुपारी तीन वाजता शनिवार पेठेत मयताच्या माहेरी घडली.
याप्रकरणी मयत आरती हिची आई सोनाली रामचंद्र चौगुले यांनी फिर्यादी असून पती अमोल अंबादास पाटील, सासरा अंबादास पाटील, सासू विमल अंबादास पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, गेल्या चार-पाच वर्षांपासून विवाहित आरती ही माहेरी येथील शनिवार पेठेत आई-वडिलांकडे राहत होत्या. पती सोबत वाद होता.
सासरी नांदण्यास घेऊन जाण्यासाठी म्हणून सासू-सासरे व पती आल्यानंतर सास-याला मेव्हणा प्रसाद चौगुले याने मारहाण केल्यानंतर रागाच्या भरात पती अमोल याने पत्नीच्या पोटात पाटीत व कमरेत धारदार शस्त्राने चाकूने वार करून गंभीर जखमी केले.
तिला उपचाराकरिता प्राथमिक रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिका-यांनी आरती यांना मयत घोषित केले. इतर जखमींवर मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
आरती ढेकळे पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची माहिती समजताच तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड व पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्ढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल पाटील यास पोलिसांनी अटक केली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक नागेश बनकर हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज