mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्या पतीला अखेर शिक्षा; मंगळवेढा येथील बहुचर्चित खटल्यात न्यायालयाचा मोठा निकाल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 22, 2026
in मंगळवेढा
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

मंगळवेढा तालुक्यातील सिद्धनकेरी गावात घडलेल्या एका अत्यंत क्रूर आणि हादरवून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. चारित्र्याच्या संशयातून एका नराधम पतीने आपल्याच पत्नीची आणि एका वर्षाच्या निष्पाप मुलीची निर्घृण हत्या केली होती.

या राक्षसी कृत्यात त्याने एवढ्यावरच न थांबता घरातील तीन निरपराध मांजरीच्या पिलांना देखील सोडले नाही. या बहुचर्चित खटल्याचा निकाल देताना पंढरपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, न्यायालयाच्या या कठोर निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

संजय नागप्पा कोरे असे या दोषी ठरलेल्या आरोपीचे नाव आहे. तो आपली पत्नी सुरेखा हिच्या चारित्र्याबद्दल सातत्याने संशय घेत असे आणि तिच्यावर शारीरिक तसेच मानसिक अत्याचार करत असे. ३ डिसेंबर २०१७ रोजी रात्रीच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. संतापाच्या भरात आरोपी संजयने लोखंडी कांबीने पत्नी सुरेखावर बेछूट वार करून तिची हत्या केली.

या भयानक हल्ल्याचा आवाज ऐकून किंवा जवळच झोपलेली त्यांची अवघ्या एक वर्षाची चिमुकली मुलगी श्रावणी जागी झाली. या नराधमाने आपल्या रक्ताच्या नात्याचीही लाज बाळगली नाही आणि झोपेत असलेल्या निष्पाप श्रावणीच्या डोक्यातही लोखंडी कांबीने वार करून तिचा जीव घेतला.

क्रौर्याची सीमा ओलांडत त्याने घरातील मांजरीच्या तीन निरपराध पिलांना देखील त्याच लोखंडी कांबीने ठेचून ठार मारले. एकापाठोपाठ एक घडलेल्या या कृत्यामुळे संपूर्ण परिसर स्तब्ध झाला होता

या अमानुष हत्येनंतर आरोपी संजय कोरे याने कोणताही पश्चाताप न दाखवता थेट गावातील काही ग्रामस्थांसमोर जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. ग्रामस्थांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला तातडीने ताब्यात घेतले आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

या खटल्याचा सखोल तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक महेश विधाते यांनी केला होता. खटल्यादरम्यान सरकारी वकील सारंग वांगीकर यांचा युक्तिवाद अत्यंत निर्णायक ठपला. न्यायालयासमोर भक्कम पुरावे सादर करण्यासाठी सरकारतर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी सिद्धराम कांबळे, समाधान वाघरे, राहुल कसबे, साधू विपुले, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. भावेश पांडे, डॉ. प्रणत शेटे आणि पशुवैद्यकीय अधिकारी दत्ता मेटकरी यांच्या साक्षी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. दरम्यान, या प्रकरणात संशयित म्हणून नाव आलेल्या इतर दोन जणांना-नागप्पा कोरे आणि शारदाबाई कोरे यांना-कलम ४९८(अ) अंतर्गत पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आले.

न्यायालयाने या खटल्याची सुनावणी करताना पत्नी आणि चिमुकलीच्या हत्येसोबतच प्राण्यांवर केलेल्या अमानुष अत्याचाराची अतिशय गंभीर दखल घेतली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे सविस्तरपणे तपासल्यानंतर पंढरपूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी संजय नागप्पा कोरे याला हत्येप्रकरणी दोषी ठरवले.

न्यायालयाने आरोपीला भादंवि कलमानुसार जन्मठेप आणि १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे, प्राण्यांवरील क्रूरतेच्या गुन्ह्यासाठी (भादंवि कलम ४२९ अंतर्गत) आरोपीला २ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपयांचा स्वतंत्र दंड ठोठावण्यात आला. न्यायालयाचा हा निकाल केवळ मानवतेच्या दृष्टीनेच नव्हे, तर मुक्या प्राण्यांवरील अत्याचाराविरोधातही एक कठोर संदेश देणारा ठरला आहे. या खटल्याच्या निकालामुळे मृत सुरेखा आणि चिमुकली श्रावणीला अंशतः न्याय मिळाला असून, कायद्याचा धाक निर्माण झाल्याचे सर्वसामान्यांकडून बोलले जात आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

मंगळवेढ्यातील ‘त्या’ एका घटनेने खळबळ! प्रांत कार्यालयाशेजारी मध्यरात्री नक्की काय घडलं? वाचा पडद्यामागचे सत्य…

August 15, 2026
मेजवानी! मराठी व हिंदी गाण्याच्या ‘ट्रॅक शो’; सुरसंगम ग्रुपचा आज सहावा वर्धापनदिन सोहळा

मंगळवेढ्यात आज घुमणार देशभक्तीचा सूर! ‘सुरसंगम’ व ‘माजी सैनिक संघटने’तर्फे ‘मेरे देशप्रेमियों…’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन

August 15, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात चोरांचा उच्छाद! पोलीस प्रशासनाला उघडे आव्हान; घर बंद दिसताच घरफोडी करून ६७ हजारांचा ऐवज लांबवला; वाढदिवसाला गेले अन् चोरट्यांनी साधला डाव

August 15, 2026
मंगळवेढ्यात ‘विश्वकर्मा महिला नागरी सहकारी पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; आकर्षक ठेवी व कर्ज योजनांचा शुभारंभ

मंगळवेढ्यात ‘विश्वकर्मा महिला नागरी सहकारी पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; आकर्षक ठेवी व कर्ज योजनांचा शुभारंभ

August 15, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

गुंतवणूक भविष्याची, बचत आजची! ​स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्राहकांसाठी ‘फ्री खरेदीखत’ ऑफर जाहीर; ‘दामाजी सिटी’ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद; आजच 9890605962 बुकिंगसाठी कॉल करा

August 16, 2026
प्रामाणिकपणाचा आदर्श! ​रात्री दामाजी चौकात पडला महागडा मोबाईल… पुढे अक्षयने जे केले त्याने जिंकली मंगळवेढेकरांची मने

प्रामाणिकपणाचा आदर्श! ​रात्री दामाजी चौकात पडला महागडा मोबाईल… पुढे अक्षयने जे केले त्याने जिंकली मंगळवेढेकरांची मने

August 13, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जुन्या वादातून तुफान हाणामारी; दोन्ही गटांचे एकमेकांवर गंभीर आरोप, मंगळवेढा पोलीस ठाण्यात १६ जणांवर गुन्हे दाखल

August 13, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
Next Post
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

बळीराजाला मोठा दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील 'या' चार गावांतील शेतकऱ्यांना पांडुरंग पावला; कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये २१ शेतकऱ्यांचा समावेश

ताज्या बातम्या

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

मंगळवेढ्यातील ‘त्या’ एका घटनेने खळबळ! प्रांत कार्यालयाशेजारी मध्यरात्री नक्की काय घडलं? वाचा पडद्यामागचे सत्य…

August 15, 2026
मेजवानी! मराठी व हिंदी गाण्याच्या ‘ट्रॅक शो’; सुरसंगम ग्रुपचा आज सहावा वर्धापनदिन सोहळा

मंगळवेढ्यात आज घुमणार देशभक्तीचा सूर! ‘सुरसंगम’ व ‘माजी सैनिक संघटने’तर्फे ‘मेरे देशप्रेमियों…’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन

August 15, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात चोरांचा उच्छाद! पोलीस प्रशासनाला उघडे आव्हान; घर बंद दिसताच घरफोडी करून ६७ हजारांचा ऐवज लांबवला; वाढदिवसाला गेले अन् चोरट्यांनी साधला डाव

August 15, 2026
मंगळवेढ्यात ‘विश्वकर्मा महिला नागरी सहकारी पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; आकर्षक ठेवी व कर्ज योजनांचा शुभारंभ

मंगळवेढ्यात ‘विश्वकर्मा महिला नागरी सहकारी पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; आकर्षक ठेवी व कर्ज योजनांचा शुभारंभ

August 15, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

गुंतवणूक भविष्याची, बचत आजची! ​स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्राहकांसाठी ‘फ्री खरेदीखत’ ऑफर जाहीर; ‘दामाजी सिटी’ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद; आजच 9890605962 बुकिंगसाठी कॉल करा

August 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..