मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मला जुगार खेळल्याने ७० लाखांचे कर्ज झाले आहे. तुम्ही सर्वजण मला पैसे द्या असे म्हणत स्वतःच्या बायको मुलाला मारून टाकण्याची धमकी देऊन
सोशल मीडियावर अश्लील मेसेज टाकल्याप्रकरणी एकाविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार २१ मार्च ते २२ मार्च दरम्यान घडला.
सिद्धेश्वर चंद्रकांत हायगुंडे (रा. न्यू संतोष नगर विजापूर रोड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. सिद्धेश्वर हा फिर्यादी अरुण रामचंद्र डिगोळे (वय ६५, रा. दमाणी नगर, सोलापूर) यांच्या भावाचा जावई आहे. त्याने घरी येऊन फिर्यादीची बायको, मुले कोठे गेली आहेत.
ती घर सोडून का गेली? असा जाब विचारला. मला जुगार खेळल्याने ७० लाखांचे कर्ज झाले आहे. तुम्ही सर्वजण मिळून मला पैसे द्या नाहीतर मी माझ्या बायको व मुलाला मारून टाकेन? तुम्हाला बघून घेईन अशी शिवीगाळ करून दमदाटी केली.
सर्वाना धक्काबुक्की केली व नंतर पोलिस स्टेशनला जाऊन अरुण डिगोळे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर घरी जाऊन स्वतः कसल्यातरी ६ गोळ्या सेवन केल्या. त्रास होऊ लागल्याने शासकीय रुग्णालयात जाऊन अॅडमिट झाला.
त्याचे फोटो फिर्यादी अरूण डिगोळे व त्यांच्या नातेवाइकांना पाठवले होते. मी आत्महत्या करून तुमचे नाव घेतो म्हणून धमकी दिली.
दुसऱ्या दिवशी त्याला पैसे न दिल्याच्या कारणावरून सोशल मीडियावर बदनामी होईल असे अश्लील स्वरूपाचे मेसेज करून बदनामी केली, असे फिर्यादीमध्ये नमूद आहे. तपास हवालदार बाचावर करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज