mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळजनक : कुटुंबीयांना विम्याचे पैसे मिळावेत म्हणून त्याने मारेकऱ्यांना दिली स्वत:चीच सुपारी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
खळबळजनक : कुटुंबीयांना विम्याचे पैसे मिळावेत म्हणून त्याने मारेकऱ्यांना दिली स्वत:चीच सुपारी

मंगळवेढा टाईम्स टीम । आपल्या कुटुंबीयांना विम्याचे पैसे मिळावेत म्हणून दिल्लीतील एका व्यापाऱ्याने सुपारी देऊन स्वत:चीच हत्या करवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १० जूनला गौरव बन्सल या व्यापाऱ्याचा मृतदेह पोलिसांनी झाडाला लटकवलेल्या अवस्थेत मिळाला होता. त्यांचे हात पाठीमागे बांधले होते. He gave his own betel nut to the killers so that the family could get insurance money

यानंतर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु झाला होता. यादरम्यान पोलिसांना चक्रावून टाकणाऱ्या गोष्टी समजल्या. गौरव बन्सल यांच्या डोक्यावर प्रचंड कर्ज होते. या कर्जातून कुटुंबीयांची सुटका व्हावी आणि त्यांना पैसे मिळावेत, यासाठी गौरव बन्सल यांनी स्वत:च्याच हत्येची सुपारी देऊ केली. यानंतर चार मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली. या सगळ्याचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला.

गौरव बन्सल हे आईपी एक्स्टेंशन परिसरात राहत होते. १० जूनला त्यांच्या पत्नीने आनंद विहार पोलीस ठाण्यात आपले पती गायब झाल्याची तक्रार केली होती. ९ जूनला ते दुकानात गेले, ते परत आलेच नाहीत, असे त्यांच्या पत्नीचे म्हणणे होते. व्यापारात झालेल्या नुकसानामुळे गौरव बन्सल डिप्रेशनमध्ये होते. त्यांच्यावर मध्यंतरी उपचारही झाले होते. 

फेब्रुवारी महिन्यात गौरव बन्सल यांनी बँकेतून सहा लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र, यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डवरून कोणीतरी परस्पर साडेतीन लाख रुपये खर्च केले होते. मयूर विहार पोलीस ठाण्यात याची तक्रारही करण्यात आली होती. त्यामुळे गौरव बन्सल तणावाखाली होते.

दरम्यान, बन्सल यांच्या पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यावेळी फोन रेकॉर्ड तपासले असता गौरव यांनी हत्येपूर्वी एका अल्पवयीन मुलाला संपर्क साधल्याचे उघड झाले. या मुलाला त्यांनी स्वत:च्याच हत्येची सुपारी दिली. ठरवल्यानुसार ९ जूनला गौरव बन्सल आपली कार घरीच ठेवून रणहौला येथे पोहोचले. रस्त्यात त्यांनी स्वत:चा फोटो व्हॉटसअॅपवरून मारेकऱ्यांना पाठवला. यानंतर गौरव रणहौला येथे पोहोचले तेव्हा मारेकरी त्यांची वाट पाहतच होते. मारेकऱ्यांनी त्यांना पकडून त्यांचे हात बांधून टाकले. यानंतर त्यांच्या गळ्यात फास टाकून त्यांना झाडाला लटकवले. 

याप्रकरणी पोलिसांनी मनोज कुमार यादव, सूरज आणि सुमीत कुमार यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या हत्येसाठी मारेकऱ्यांना किती पैसे देण्यात आले होते, गौरव यांच्या डोक्यावर किती कर्ज होते, याचा सध्या पोलीस तपास करत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeDesh-videsh

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापूर । पोलीस असल्याची बतावणी करत 28 हजारांचा ऐवज केला लंपास

सोलापूर । पोलीस असल्याची बतावणी करत 28 हजारांचा ऐवज केला लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 21, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

तळणीनंतर खाद्यतेल पुन्हा वापरणारांनो सावधान! खाद्य तेलाबद्दल तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, ‘हा’ नियम न पाळल्यास 7 वर्षापर्यंत शिक्षा; विक्रेत्यांना गंभीर इशारा

August 21, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

गावाचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढा, पण पोलिसांचा 35 ग्रामस्थांवर गुन्हे; मंगळवेढ्यात बायपास आंदोलनावरून ग्रामस्थ आक्रमक; हक्क मागणे हा गुन्हा आहे का?

August 21, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

आनंदवार्ता! ‘या’ वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

August 20, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

धक्कादायक! सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

August 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा