मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । इचलकरंजी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थात्मक विलगीकरण कक्षातील मुलीचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकरणी गावभाग पोलिसांनी अमिर मरमसाब शेख (वय २१, रा. कोल्हापूर नाका) याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. या घटनेनंतर विलगीकरण केंद्राजवळ मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर संशयीत शेख याला विलगीकरण कक्षातून ताब्यात घेवून अटक केली आहे.
इचलकरंजी येथील प्रशासनाने एका शैक्षणिक संस्थेच्या हॉस्टेलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. बाहेर गावांहून आलेल्या नागरीकांना येथील विलगीकरण कक्षात ठेवले जाते. पिडीत मुलगी सांगोला (जि.सोलापूर) येथून आई वडीलांसह इचलकरंजी असा प्रवास केला आहे.
रेड झोन असलेल्या जिल्ह्यातून आल्यामुळे आयजीेएम रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना या ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
यातील पिडीत मुलगी काल सकाळी केंद्रातील गर्ल्स हायस्कूलच्या स्नानगृहात स्नान करीत होती. त्यावेळी संशयीत शेख हा छप्पर नसलेल्या स्नानगृहाच्या भिंतीवर चढून पिडीत मुलीचा विनयभंग केला. या प्रकारानंतर या ठिकाणी एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला. पोलीस उप अधिक्षक गणेश बिरादार यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. संशयीत शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. पिडीत मुलीने याबाबतची तक्रार दिली आहे.
—————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज