mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा शहरातून बठाणकडे जाणारा ४० हजारांचा गुटखा पकडला; स्थानिक होलसेल गुटखा विक्रेत्यांचा शोध पोलिसांनी घ्यावा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 19, 2021
in मंगळवेढा
राष्ट्रीय महामार्गालगत आसलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करणारे तिघे जेरबंद

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहराकडून बठाणकडे अवैधरित्या मोटर सायकलवरून जाणारा ४० हजार रुपये किमतीचा गुटखा मंगळवेढा पोलिसांनी पकडला असून याप्रकरणी वाहिद हिदायत मुलाणी (वय २९), सादिक महंमद सलीम मुल्ला (वय ३८ दोघे रा.मुलाणी गल्ली, मंगळवेढा) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागातील पान टपरी वाल्यांना स्थानिक होलसेल गुटखा विकणारे माल पुरवत आहेत.विक्रेते मात्र पोलिसांच्या हाताला लागत नाहीत. त्यांचा शोध पोलिसांनी घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, वरील दोघे आरोपी दि.१५ रोजी दुपारी १२.०० च्या दरम्यान मोटर सायकल क्रमांक एम एच १३ डी.एल .७ ९ ५४ वरून आर एम डी पान मसाल्याचे ४० बॉक्स व एम सुगंधीत तंबाखूचे ४० बॉक्स असा ४० हजार रुपये किमतीचा गुटखा कर्नाटक राज्यातील चडचण येथून खरेदी करून ते मंगळवेढा शहरातून बठाणकडे जाताना

या मार्गावरील जलशुध्दीकरण केंद्राजवळ डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी पकडला.

याची फिर्याद अन्न व औषध प्रशासनातील मंगेश लवटे यांनी दिल्यानंतर वरील दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान महाराष्ट्रात गुटख्याला पुर्णता बंदी असतानाही मंगळवेढा शहरापासून चडचण हे केवळ २५ किमी . अंतरावर असल्याने व्यवसायिक या ठिकाणी जावून खरेदी करून याची विक्री मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात करीत असल्याचे चित्र आहे.

गुटखा हा अन्न औषध प्रशासन विभागाकडे येत असल्यामुळे व ते अधिकारी या भागात फिरकत नसल्यामुळे पान टपऱ्या व हॉटेल यामधून गुटखा विक्रीचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत आहे.

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सर्व व्यवहार बंद असून जागोजागी सीमेवर पोलिस असतानाही त्यांच्या नजरा चुकवून बेकायदेशीर वाहतूक करीत हा गुटखा मंगळवेढा ग्रामीण भागात पोहोचत असल्याचे या कारवाईमुळे उघड झाले आहे.

या कारवाईमुळे अन्न औषध प्रशासन नेमके करते तरी काय असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.पोलिसांनी गुटखा पकडल्यानंतरच अन्न औषध प्रशासनचे अधिकारी केवळ फिर्याद देण्यासाठीच मंगळवेढयात अवतरत असल्याचा बोलबोला सुरु आहे. हे अधिकारी नेमके कधी येवून जातात याचा मागोवा जनतेला अदयाप तरी लागला नसल्याच्या तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

पुणे येथील अन्न औषध प्रशासनचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी जनतेतून आग्रहाने मागणी पुढे येत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा पोलीस स्टेशन

संबंधित बातम्या

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 25, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! काळ्या आईची सेवा करतानाच काळाची झडप; मंगळवेढ्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

September 24, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
Next Post

लय भारी! मंगळवेढ्यातील सर्व कोरोना रुग्णांना मिळणार नॉनव्हेज सूप व आठवड्यातून अंडी मोफत; हॉटेल संगमचा स्तुत्य उपक्रम

ताज्या बातम्या

प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा