mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! डिझेल अंगावर टाकून नातवाने आजीला पेटविले; आजीचा होरपळून मृत्यू; सोलापूर जिल्ह्यातील घटना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 7, 2023
in क्राईम, सोलापूर
चित्रपटसृष्टी हळहळली! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी जीवन संपवलं

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

आपल्या सख्ख्या नातवाने आजीच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे.

शेतातील उत्पन्नाचे पैसे आम्हाला का देत नाही, याचा राग मनात धरून तेवीस वर्षांच्या नातूने घरासमोर स्वयंपाक करत बसलेल्या सत्तर वर्षांच्या आजीला डिझेल अंगावर ओतून पेटवून दिले. यामध्ये आजीचा होरपळून जागीच मृत्यू झाला.

ही घटना लऊळ (ता. माढा) येथे रविवारी (ता. ६) सकाळी साडेनऊच्या दरम्यान भवर वस्तीवरील पंढरीनाथ शिंदे यांच्या राहत्या घरासमोर घडली. हर्षद संभुदेव शिंदे (वय २३, रा. राजगुरूनगर, पुणे) असे नातवाचे नाव असून, शांताबाई पंढरीनाथ शिंदे (वय ६५, रा. लऊळ) असे या घटनेत मृत्यू झालेल्या आजीचे नाव आहे.

कुलदीप संजय कोकाटे (वय २४) यांच्या फिर्यादीवरून कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला कुर्डुवाडी येथील परांडा चौकात काही तासांतच अटक करण्यात पोलिसांना यश आले.

फिर्यादी संजय कोकाटे हे रविवारी सकाळी गाईच्या धारा काढून दूध डेअरीवर दूध घालून घराकडे जात असताना, चिंचेच्या झाडाखाली मोठा जाळ दिसला. जवळ जाऊन पाहिले असता आजी पेटलेली दिसली.

आजूबाजूला पाहिले असता संशयित आरोपी हर्षद शिंदे हा पळून जाताना दिसला. त्यास आवाज दिला असता तो मागे वळून पाहिले व पसार झाला. संजय कोकाटे हे तातडीने घरी जाऊन आई- वडिलांना घेऊन घटनास्थळी आले.

आईने आरडाओरड केला असता बाजूचे लोक जमा झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. पोलिस उपअधीक्षक पाटील व पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत वाघमारे तपास करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर बातमी

संबंधित बातम्या

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक फायनल? अधिकृत घोषणा बाकी; मात्र भाजपच्या ‘त्या’ नेत्याच्या एन्ट्रीने सस्पेन्स वाढला

May 30, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

​ग्रामस्थांनो, हेलपाटे मारायचे बंद! आता थेट सोलापूर जिल्हा परिषदेच्या CEO च्या व्हॉट्स ॲपवर पाठवा अर्ज; तक्रार निवारणासाठी हेल्पलाइन नंबर केला जारी

May 26, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राष्ट्रीय कर्तव्य बजावताना आदर्श शिक्षकाचा उन्हाच्या तडाख्याने दुर्दैवी मृत्यू; शिक्षण क्षेत्र हादरले

May 26, 2026
Next Post
शेतकाऱ्यांची सुटका! घर बसल्या आपल्या मोबाईलवरून करा पिक नोंदणी; आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

शेतकऱ्यांनो! बाजार समितीत माल पाठवा, 24 तासांमध्ये पैसे मिळवा; शेतमालाला तात्काळ पैसे देण्याचे मंत्री सत्तार यांचे आदेश

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

जमिनीच्या तुकड्यासाठी कोर्टाची पायरी चढणाऱ्यांनी एकदा वाचाच; वडिलांच्या निधनानंतर मुलांनी घराच्या अंगणातच केलं असं काही पंचक्रोशीतून होतंय प्रचंड कौतुक

May 31, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगेंनी लढाई जिंकली, उपोषण सोडलं; सरकारकडून मागण्या मान्य; अंतरवालीत मध्यरात्री काय घडलं?

May 31, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक फायनल? अधिकृत घोषणा बाकी; मात्र भाजपच्या ‘त्या’ नेत्याच्या एन्ट्रीने सस्पेन्स वाढला

May 30, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

तब्बल पावणे सतरा लाखांचा गैरव्यवहार; ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे थेट निलंबन, विभागीय आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय

May 30, 2026
राजनंदिनी महिला ग्रामीण बँकेचा आज मंगळवेढ्यात भव्य उद्घाटन सोहळा; निराधार महिलांना इतरांपेक्षा एक टक्का कमी व्याजदर

मंगळवेढ्यात सुवर्णसंधी! ‘राजनंदिनी महिला ग्रामीण पतसंस्थे’त विविध पदांसाठी थेट भरती; रविवारी मुलाखती

May 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा