मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
शेतकरी बांधवांची कोणीही फसवणूक अथवा अडवणूक करू नये. शेतकऱ्यांसाठी जे कायदे केलेले आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे.
अशा ठिकाणी विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे २४ तासांत दिले गेले पाहिजेत, अन्यथा संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला.
श्री.विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन व खासगी कार्यक्रमाच्या निमित्तान मंत्री अब्दुल सत्तार रविवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे १०-१० दिवसानंतर मिळतात. तसेच वेळेवर पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतमालाची विक्री झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना २४ तासांत पैसे दिले पाहिजेत.
ज्या बाजार समिती या आदेशाचे पालन करणार नाहीत, आणि तशा स्वरूपाच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
शेतकऱ्यांचा शेतमाल बाजार समितीत आल्यानंतर त्याचा दर कमी असतो, आणि नंतर तो वाढला जातो, अशा प्रकारच्या तक्रारी आपल्याकडे येत आहेत. शेतमालाची वेळेवर खरेदी झाली पाहिजे. तसेच शासनाने जो दर ठरवून दिलेला आहे, त्यापेक्षा अधिक दर दिला तर अडचण नाही.
मात्र, कमी दर दिल्यास त्यावर लक्ष ठेऊन आम्ही पणन विभागाच्यावतीने कारवाई करू. बेदाणा सौदे बाजारात सॅम्पल म्हणून खरेदीदार दीड ते दोन किलो बेदाणा घेत असल्याच्या तक्रारी असून सॅम्पल म्हणून ठरवून दिल्याप्रमाणेच किमान १०० ग्रॅम बेदाणा घेण्याच्या सूचना बाजार समित्यांना दिल्या आहेत.
जास्त सॅम्पलच्या नावाखाली त्यापेक्षा अधिक बेदाणा घेणाऱ्या खरेदीदार, व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे ही मंत्री सत्तार यांनी स्पष्ट केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज