टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाविकास आघाडीकडून विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आघाडी घेतली आहे. शिवसेना युबीटी पक्षाकडून अधिकृत 65 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
यापूर्वी, 40 पेक्षा जास्त उमेदवारांना शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत.
तर, आता उर्वरीत बहुतांश मतदारसंघात उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये, आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे.
या उमेदवारी यादीत 65 जणांना तिकीट देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह दिग्गजांचा यामध्ये समावेश आहे. मुंबईतील 13 मतदारसंघातील उमेदवार शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आले आहेत.
अनेक नव्या चेहऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाने संधी दिली आहे
कोपरी पाच पाखडी या विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे विरोधात केदार दिघे यांना उमेदवारी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी. pic.twitter.com/QAJ01ce7ds
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 23, 2024
शिवसेना ठाकरे गटाने 15 पैकी 14 आमदारांना पुन्हा एकदा पहिल्या यादीमध्ये स्थान दिलं आहे. मात्र, शिवडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अजय चौधरी यांना अजूनही वेटिंगवर ठेवलं आहे.
त्यामुळे शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरी की सुधीर साळवी हा सस्पेन्स अजूनही कायम आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज