mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

माढा, मंगळवेढा-पंढरपूरचा सस्पेंन्स कायम; शरद पवार कोणाला संधी देणार? दोन्ही मतदारसंघात नवीन चेहरा देण्याची शक्यता? विकास मुद्द्यावरून निवडणूक गाजनार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 25, 2024
in मंगळवेढा, राजकारण
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। संपादक : समाधान फुगारे

सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ व मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाचा सस्पेन्स अजून कायम राहिला आहे. शरद पवार गटाची पहिली यादी काल जाहीर करण्यात आली आहे.

जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये माढा व मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघ अजून वेटिंग वर का ठेवला आहे? याची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये होऊ लागली आहे.

दरम्यान काल भगीरथ भालके यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असून आज वसंतनाना देशमुख हे आपला अर्ज भरणार आहेत. या दोघांनीही तुतारी मिळावी यासाठी मागणी केली आहे.

दुसरीकडे भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत हे सध्या मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांनीही अर्ज घेतला असून येथे एक-दोन दिवसात अर्ज दाखल करणार आहेत.

सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी अनिल सावंत हेच प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले असून त्या अनुषंगाने प्रचार देखील सुरू केल्याचे दिसत आहे.

तिकडे माढयामध्येही माढ्याचा तिढा कायम असून अभिजित पाटील यांनी देखील उमेदवारी मलाच मिळणार अशी खात्री बाळगली आहे. तसा प्रचार देखील त्यांनी सुरू केला आहे. तर आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील शर्यतीत आहेत.

एक-दोन दिवसात प्रसिद्ध होणाऱ्या दुसऱ्या यादीमध्ये तरी मंगळवेढा-पंढरपूर व माढा या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर होणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळीच्या मॅरेथॉन बैठका सुरू असून त्यानंतर  आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

तर परिचारक यांचे कार्यकर्ते अपक्ष निवडणुकीवर ठाम आहेत. एक-दोन दिवसात प्रशांत परिचारक देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.

विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचे देखील पहिल्या यादीत नाव आले नाही तेही दुसऱ्या यादीच्या प्रतीक्षेत आहेत. तर मनसेचे नेते दिलीप धोत्रे हेही एक-दोन दिवसात अर्ज भरणार आहेत.

मंगळवेढा व पंढरपूर विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार असून आतापर्यंत केलेल्या विकास कामाचे मूल्यमापन जनता करणार असून ज्यांनी खरीच कामे केली आहेत. अशा उमेदवाराच्या पाठीमागे जनता राहणार असल्याचे चित्र मतदारसंघांमध्ये आहे.

एकीकडे विकास कामाच्या बड्या बड्या बाता मारून आज पर्यंत जनतेचा विश्वासघात केलेल्यांना जनता जागा दाखवून देणार असल्याचे बोलून दाखवत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शरद पवार

संबंधित बातम्या

पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

विधानपरिषदेचा धुराळा! सोलापूर महायुतीकडे, पण भाजपच्या कोट्यातून कोणाची लागणार लॉटरी? ‘या’ नावांची चर्चा; भाजपच्या गोटात हालचालींना वेग

May 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी आ.समाधान आवताडेंची मोठी कामगिरी; परिवहन कार्यालयाच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; कार्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा

May 16, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा शहर अतिक्रमणमुक्त करा! संतप्त नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना साकडे; प्रमुख ‘या’ ८ ठिकाणांचा उल्लेख

May 15, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मंगळवेढेकरांच्या तक्रारींचे आता जागच्या जागी निवारण; ‘महसूल समाधान शिबिरा’चे आज आयोजन; प्रलंबित कामांचा निपटारा होणार

May 15, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

इंधन बचतीसाठी सभापतींचा पुढाकार! दीपाली ताड आता ‘लालपरी’ने करणार प्रवास

May 14, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मोठी बातमी! मंगळवेढा बसस्थानक की चोरांचा अड्डा? पोलिसांचा धाक संपला का? भरदिवसा वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ लंपास

May 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

काय चाललंय मंगळवेढ्यात? पंचायत समितीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत

May 12, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा नगरपालिकेत ‘जनता दरबार’ भरवा; ‘एक दिवस गावासाठी’ अभियानाची आग्रही मागणी; ​प्रशासकीय पारदर्शकता आणि शहर विकासासाठी नागरिकांचे थेट साकडे

May 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात गांजा विक्रीचे मोठे रॅकेट उध्वस्त; पाच जणांवर गुन्हे, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुण गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

May 10, 2026
Next Post
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मोठी बातमी! अजित पवार गटाकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर, यांची नावे जाहीर; त्यापूर्वी केली मोठी खेळी

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाचे अस्त्र बाहेर काढणार; ‘या’ तारखेपासून करणार आमरण उपोषण

May 17, 2026
सांगोला-मंगळवेढा-सोलापूर या रेल्वे मार्गाची गरज; शेतकऱ्यांना होणार ‘हा’ मोठा फायदा

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! विमानासारखं सीट बुकिंग आणि ५ पटीने जास्त स्पीड; काय आहे रेल्वेचा नवा प्लॅन? रेल्वे प्रवासात मोठा बदल

May 17, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

दहावीत ९१ टक्के! ‘अभ्यास कर’ म्हणणे एवढे झोंबले? नवीन मोबाईल आणल्यानंतर काही तासांतच १६ वर्षांच्या शिवमचा टोकाचा निर्णय

May 17, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

बँकेची दिशाभूल करण्यासाठी एक थक्क करणारा देखावा; रचला स्वतःच्या मृत्यूचा कट, दारू पाजून मित्रालाच संपवलं; 8 महिन्यानंतर थरारक घटनेचा उलगडा

May 17, 2026
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

विधानपरिषदेचा धुराळा! सोलापूर महायुतीकडे, पण भाजपच्या कोट्यातून कोणाची लागणार लॉटरी? ‘या’ नावांची चर्चा; भाजपच्या गोटात हालचालींना वेग

May 17, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

महसूल विभागातील सुनावण्यांबाबत मोठा निर्णय, वेळेत निकालासाठी नवीन कार्यपध्दती लागू; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा पुढाकार

May 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा