मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायतीकडे कार्यरत असलेल्या १७८ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जून २०२१ ते मार्च २०२२ या दहा महिन्याच्या कालावधीतील वेतनातील फरकापोटी
६३ लाख ८७ हजार ६५ रुपये पंचायत समितीला प्राप्त होऊनही अद्याप कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी २८ मेपासून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे गटविकास अधिकारीना दिला.
या संदर्भातील निवेदन पंचायत समितीला देण्यात आले होते. या निवेदनावर ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष जामदार, उपाध्यक्ष मसा साखरे, सचिव नवनाथ कांबळे यांच्या सह्या आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतीकडे स्वच्छता व पाणीपुरवठा करण्यासाठी १७८ ग्रामपंचायत कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्याच्या वेतनातील सुधारित फरक जून २०२१ ते मार्च २२ च्या दरम्यानचा दहा महिन्याचा फरकाचा निधी जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीला ९ मे रोजी प्राप्त झाला आहे.
ही रक्कम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर अद्याप वर्ग केली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
ग्रामपंचायतीकडे अतिशय तोकड्या पगारावर ते काम करीत असून, त्यांच्याकडून काम मात्र पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांइतके करून घेतले जात आहे.
ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांच्या सूचनेचे पालन करताना ते अधिकच मेटाकुटीला आले असताना मात्र अन्य शासकीय कर्मचाऱ्यापेक्षा त्यांच्यातील कामाचे वेतन हे अतिशय तोकडे आहे आणि ते देखील अवेळी होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज