mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मुख्यमंत्री फडणवीस साहेबांवर मराठ्यांचा विश्वास बसलाय, त्यांनी फक्त एवढेच करावे एवढीच अपेक्षा; मनोज जरांगे पाटील यांचे वक्तव्य

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 24, 2025
in राज्य
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

मुख्यमंत्री फडणवीस साहेबांवरती मराठ्यांचा विश्वास बसला आहे. त्यांनी तो ढळू देऊ नये एवढीच अपेक्षा आहे’ असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. जीआर ओके आहे, थोडाफार बिघडला तरी तो दुरुस्त करण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे.

पण तात्पुरता आनंद आपल्या जवळ जमत नाही. तुम्ही जीआर काढला त्याचा आम्ही कौतुक केलं. मात्र आता प्रमाणपत्र वितरित होणे गरजेचे आहे. असेही जरांगे पाटील म्हणाले.

एकीकडे जीआरमुळे ओबीसींना धक्का लागत नाही म्हणायचं, त्यांना खुश करायचं आणि इकडे मराठा समाजाला सांगायचं तुम्हाला जीआर दिला म्हणजे ते खुश. हे मतदाना पुरतं आहे. हे माझ्याजवळ चालत नसतंय. तात्पुरता आनंद आपल्याजवळ जमत नाही. प्रमाणपत्र वितरित होणे गरजेचे आहे. असेही जरांगे पाटील म्हणाले.।

दिवाळी, पाडवा, भाऊबीज झाल्यानंतर शेतकरी तज्ञांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करू

शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने दिलेला नुकसान भरपाईचानिधी आलाच नाही. शेतकऱ्यांवर संकट असताना त्यांना हातभार लावणे सरकारची जबाबदारी आहे. मात्र तात्पुरता आनंद देणारे हे सरकार आहे. 75 वर्षापासून हेच होतंय.

मात्र दिवाळी, पाडवा, भाऊबीज झाल्यानंतर शेतकरी तज्ञांना अंतरवालीमध्ये बोलवून त्यांच्याशी चर्चा करू. त्यानंतर राज्याची बैठक घेऊन पुढील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तारीख जाहीर करू. अशी महत्वाची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

रस्त्यावर येऊन सरकारचे कपडे फडावेच लागतील

रस्त्यावर येऊन सरकारचे कपडे फडावेच लागतील, त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. जसे 70 वर्षे गेले तसे आपल्या अनेक पिढ्या जातील. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आपण सर्वांनी आपला सन्मान सोडून द्यायचा आणिएकत्रयायचं, असे आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केलंय.

कोणाच्या बापाचं जीआरला हात लावायला टप्पर नाही

“ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची भूमिका ठाम असून, कोणाच्याही ताटातील वाटा काढून दुसऱ्याला दिला जाणार नाही,” अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 2 सप्टेंबरचा शासन निर्णय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे, त्यावर अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही.

मात्र, हैद्राबाद गँझेटियर हे मराठवाडा आणि विदर्भ या भागापुरतेच लागू असून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे, ओबीसी नेत्यांनी गैरसमज करुन घेऊ नये, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान,याच मुद्दयांवर भाष्य करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, बावनकुळे यांचे त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी सर्वचालू आहे. ओबीसीचं त्यांना काही देणे-घेणे नाही. ओबीसी नेत्यांची राजकारणासाठी धडपड चालू आहे. हा जीआर कोणी रद्द करू शकत नाही, कोणाच्या बापाचं त्याला हात लावायला टप्पर नाही.

दरम्यान, 2 सप्टेंबरचा जीआरमुळे मराठवाड्यातील मराठा एक ना एक दिवस सगळा आरक्षणात जातो. बावनकुळे यांचे म्हणणं आहे कि पाच जिल्ह्यांसाठी जीआर, पण मराठवाड्यात पूर्वी पाचच जिल्हे होते ते आता आठ झाले. मराठ्यांनी दमा दमाने जावे, ही माझी अपेक्षा आहे. असेही ते म्हणाले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मनोज जरांगे पाटील

संबंधित बातम्या

धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

बळीराजाला मोठा दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ चार गावांतील शेतकऱ्यांना पांडुरंग पावला; कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये २१ शेतकऱ्यांचा समावेश

July 23, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

देवस्थान लुटलं! ‘या’ मंदिरात तब्बल 60 कोटींचा महाघोटाळा; तपासासाठी आलेल्या महिला ऑफिसरने मारला डल्ला

July 22, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 21, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

घरात चालायची दुधात डिटर्जंट, युरिया आणि रसायनांची भेसळ, रंगेहात पकडले; तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

July 23, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

महाराष्ट्रावर आस्मानी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

July 18, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

दसरा-दिवाळी दरम्यान ग्रामपंचायतींसाठी निवडणूक! सरपंच निवड थेट जनतेतून; ४ ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या; निवडणुकीसाठी वापरली जाणार ‘या’ तारखेची मतदार यादी

July 20, 2026
Next Post
बिरोबा-महालिंगराया गुरु शिष्याची आज हुलजंतीत भेट, लाखो भक्त दाखल; भाविकांच्या माहितीसाठी यात्राशेड उभा

मोठी बातमी! कोरोनापेक्षा भयंकर महामारी येणार, हुलजंतीमध्ये बिरोबा-महालिंगरायाच्या भेटीचा सोहळ्यात भाकणूक; लाखो भाविकांची उपस्थिती

ताज्या बातम्या

धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 28, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा