मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत, अशी आक्षेपार्ह टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. पडळकर यांनी केलेल्या या टीकेनंतर वादाला तोंड फुटलं आहे. पडळकर यांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे भाजपने पडळकर यांचं हे वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगत, या प्रकरणातून हात झटकले आहेत. After Gopichand Padalkar’s statement about Sharad Pawar, NCP is aggressive
‘पडळकर यांनी शरद पवारांविषयी मांडलेल्या भूमिकेबाबत भाजप असहमत नाही, पण त्यांनी जो शब्दप्रयोग वापरला, तो १०० टक्के चूक आहे. भाजप या शब्दप्रयोगाशी पूर्णपणे असहमत आहे. शरद पवारांच्या राजकीय धोरणाबाबत आमचे मतभेद आहेत.
मोदी साहेबांवर किती वेळा नाय नाय त्या घाणेरड्या भाषेत राष्ट्रवादीवाले आणि काँग्रेसवाले बोलले आहेत.. पडळकरांच्या त्या वक्तव्याचं समर्थन मी करत नाही पण भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या किव्हा कार्यकर्त्याच्या कोण अंगावर जाणार असेल तर लक्षात ठेवा… जशास तसे उत्तर देऊ.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 24, 2020
आम्ही त्यांच्यावर टीका केली आणि यापुढेही करू, पण सार्वजनिक जीवनात असताना, कोणावरही अशी टीका करणं ही भाजपची परंपरा नाही,’ असं भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर म्हणाले आहेत. दुसरीकडे ज्येष्ठ आणि मोठ्या नेत्यावर टीका करताना काळजी घ्यायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज